३५ गावच्या पाण्याबाबत मी स्वतः आता जातीने लक्ष घालणार:-समाधान दादा आवताडे*

 *३५ गावच्या पाण्याबाबत मी स्वतः आता जातीने लक्ष घालणार:-समाधान दादा आवताडे*



 





मंगळवेढा तालुक्यातील गाव भेट दौरा आयोजित केला होता या दौऱ्यास सर्व उपस्थित नागरिकांनी व मतदारांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रतिसाद दिला असून, मंगळवेढा तालुक्यातील 35 गावातील पाण्याच्या प्रश्नाबाबत स्वतः याबाबत लक्ष घालणार असल्याचे यावेळी आमदार समाधान दादा अवताडे यांनी उपस्थित सर्व मतदारांना सांगितले.

तीन ते चार दिवसापासून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार समाधान दादा अवताडे यांनी मंगळवेढा तालुक्यातील गाव भेट दौरा आयोजित केला असून, या दौऱ्यास नागरिकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद दिला आहे यावेळी पाणी डी पी चे प्रश्न पानंद रस्त्याचे प्रश्न, त्याबरोबर ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद व तालुकास्तरावरील जे काही प्रश्न असतील व त्या त्या संबंधित विभागाचे अधिकारी व सर्व कर्मचारी यांना सोबत घेऊन समाधान दादा अवताडे यांनी हे प्रश्न सोडवले आहेत. समोरासमोर जागेवरच सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करून सर्व कामाचा निपटारा लावण्याची जबाबदारी दादांनी चांगल्या पद्धतीने पार पाडली आहे. या दौऱ्यास सार्वजनिक बांधकाम विभाग पशुसंवर्धन खाते पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार कृषी अधिकारी वीज मंडळाचे अधिकारी, तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील अधिकारी याच बरोबर सर्व संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन हा गाव भेट दौरा समाधान दादा अवताडे यांनी आयोजित केला आहे त्यामुळे सर्व ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये समाधान दादा आवताडे यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

या दौऱ्यास, अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या दौऱ्यात समाधान दादा अवताडे यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी त्याचबरोबर संबंधित सर्व मित्रपरिवार अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.