राष्ट्रीय पेसापालो स्पर्धेत १४ राज्यातील ३३ संघांचा समावेश



राष्ट्रीय पेसापालो स्पर्धेत १४ राज्यातील ३३ संघांचा समावेश 



       १२ वी राष्ट्रीय पेसापालो स्पर्धा आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल मोहिली-अघई ता.शहापूर जि.ठाणे येथे 22 एप्रिल ते 25 एप्रिल 2022 मध्ये उत्साहात सुरू झाली. या स्पर्धेत राजस्थान, केरळ, छत्तीसगड, मुंबई, गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तमिळनाडू, मध्य-प्रदेश दिल्ली, जम्मू-काश्मीर, हरियाणा, आसाम, महाराष्ट्र या राज्यांतून पुरुष, महिला व मुलामुलींची संघ सहभागी झाले आहेत. या स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आत्मा मालिक संकुलाचे कार्याध्यक्ष, श्री. उमेशजी जाधव साहेब, श्री.चेतन पागावाड, सचिव, पेसापालो फेडरेशन ऑफ इंडिया श्री.दिनेश कुमार, सचिव, राजस्थान, श्री. मारुती मरक्कम, सचिव, छत्तीसगड श्री. पद्मकुमार, सचिव, केरळ, घनश्याम शिंदे, तांत्रिकी समिती प्रमुख, सुनील क्रॉडसर्स पंचप्रमुख उपस्थित होते. तसेच आत्मा मालिक संकुलाचे स्पोर्ट टीचर सौ. शशिकला खडताळे, श्री. आर भास्करन हेही उपस्थित होते.

       आज दिनांक 23 एप्रिल २०२२ रोजी झालेल्या पुरुष गटातील महाराष्ट्र विरुद्ध छत्तीसगड स्पर्धेत महाराष्ट्राने १२ गुण आणि छत्तीसगड ने १ गुण  बनविले. महाराष्ट्राकडून अंकित परब, ऋषीराज गोळे, विनोद सिंग, मुन्ना सिंग आणि छत्तीसगड तर्फे अवनीत टिग्गा, शेखर ज्वालाप्रताप यांनी आपल्या चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले.


       महिला गटात महाराष्ट्र विरुद्ध छत्तीसगड या सामन्या मध्ये महाराष्ट्र संघातर्फे रसिका संकपाल, दिव्या देवरे, तेजल शेलार आणि छत्तीसगड संघातर्फे सपना चंद्रकार, अनुप्रिया टिरकी, सैजल केरकट्टा यांनी आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन केले.

राजस्थान विरुद्ध महाराष्ट्र पुरुष गटामध्ये राजस्थान तर्फे करन सैनी, विष्णू सैनी, रोहिदास सैनी आणि महाराष्ट्र तर्फे एलेक्स चेट्टी, डॅनियल पेरुम्मली, श्याम चौधरी व आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचे विश्वजीत कवटे, पंकज शिबडे व ऋतिक कुराडे यांनी आपल्या खेळाचे उत्तम प्रदर्शन केले.

     पेसापालो हा खेळ फिनलँड या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे व हा खेळ भारता मध्ये २०१२ पासून विविध राज्यांमध्ये खेळला जातो. २०१९ मध्ये याची विश्व स्पर्धा पुणे-महाराष्ट्र येथे संपन्न झाली व त्या स्पर्धेमध्ये भारताचा ४था क्रमांक आला होता व या खेळाचे इंटरनॅशनल ऑलम्पिक १९५२ मध्ये प्रात्यक्षिक दाखविले आहे. या खेळाचा स्कूलगेम फेडरेशन ऑफ इंडिया (SGFI) मध्ये प्रात्यक्षिक झालेले आहे व हा खेळ लवकरच शालेय स्तरावर याचा समावेश होणार आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad