*वंशाने जरी बाबासाहेबांचे वारस नसलो तरी खऱ्या अर्थाने आम्ही बाबासाहेबांच्या विचारांचे वारस..*
*प्रहार जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ मस्के पाटील.,*
विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून तालुका सरचिटणीस प्रवीण मखरे यांच्या नेतृत्वात केम् येथे शंभर जणांचे रक्तदान आणि जवळजवळ पाचशे लोकांचे सर्वरोग निदान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले.
आज 14 एप्रिल संपूर्ण भारत देशासाठी अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आणि या आनंदाच्या दिवशी विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून केम या गावी एक आगळावेगळा कार्यक्रम पार पडला यात सर्वश्रेष्ठ दान म्हणजेच रक्तदान या शिबिरात शंभरच्यावर युवकांनी सहभाग नोंदवत खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना वंदन केले,नमन केले,त्याचबरोबर पाचशेच्या वरती ऊस तोड मजूर वीट भट्टी कामगार यांनी सर्व रोग तपासणी शिबिरात उस्फूर्तपणे भाग घेतला.
यावेळी बोलताना प्रहार जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांनी सांगितले आज पर्यंत ज्याप्रकारे बँजो ताशा या गोष्टीत बौद्ध तरुणांना नेतेमंडळींनी अडकून ठेवले त्याला फाटा देत बाबासाहेबांचा वारसा विचार घेऊन समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी आजचा तरुण पुढे येत आहे रक्तदान सर्वरोग निदान शिबिर वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम करत समाजासाठी आदर्श घालून देत आहे ही खऱ्या अर्थाने अभिमानाची बाब आहे.
यावेळी प्रहारचे तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, युवा जिल्हा उपाध्यक्ष युनूस पठाण तालुका सरचिटणीस प्रवीण मखरे तालुका संपर्कप्रमुख सागर पवार तालुका संघटक नामदेव पालवे महिला तालुकाध्यक्ष स्वातीताई गोरे तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव प्रविण मत्रे,ज्येष्ठ नेते अच्युत काका पाटील शिवसेनेचे नेते सागरराजे तळेकर,मुख्याध्यापक रंधवे सर गायकवाड सर अवताडे सर सचिन रनशिगारे, धनंजय ताकमोगे,संभाजी गुरव प्रमोद गाडे दशरथ गावडे पिंटू ओहळ बंटी गाडे प्रसाद गाडे प्रशांत मखरे शुभम गाडे अतुल गायकवाड सौरभ मखरे रोहित मखरे लक्ष्मण देडगे विजय पवार सुरज गाडे तुषार गायकवाड डॉक्टर पालखे डॉक्टर जगदाळे,यांच्यासह अनेक पदाधिकारी व केम गावातील नागरिक उपस्थित होत