*खासदार शरद पवार यांच्या घरावरील निषेधासाठी पंढरीत हजारोंचा मोर्चा..,*
*कल्याणराव काळे यांनी केले नेतृत्व.*
पंढरपूर (प्रतिनिधी) दि.11- राष्ट्रीय नेते, शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या मुंबई येथील सिल्वर ओक या निवास्थानावर झालेल्या भ्याड हल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पंढरपूर तहसिल कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस नेते सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरु झालेल्या या मुक मोर्चामध्ये हजारो लोकांनी सहभाग नोंदविला. स्टेशन रोड मार्गे निघालेल्या मोर्चाचे तहसिल कार्यालय येथे तहसिलदारांना निवेदन देवून विसर्जन करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक व राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या निवासस्थानावर झालेल्या हल्याच्या निषेधार्थ काढण्यात येणाऱ्या मोर्चासाठी सकाळी 9 वाजले पासून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे नागरीकांची गर्दी जमु लागली. यावेळी संयोजक कल्याणराव काळे यांनी सर्व प्रथम महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळयास जयंतीनिमित्त कार्यकर्त्यासह जावून अभिवादन केले. सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळयास पुष्पहार अर्पण करुन मोर्चास सुरुवात झाली. भर उन्हात दंडाला व तोंडाला काळया पटया बांधुन सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या पुढे हातात निषेधाचा फलक घेवून नेते मंडळी मोर्चात सहभागी झाले. स्टेशन रोड वरुन वि.दा.सावरकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, भाई राऊळ यांच्या पुतळयांना पुष्पहार अर्पण करुन हा मोर्चा तहसिल कार्यालयावर सकाळी 11.30 वाजता धडकला.
तहसिल कार्यालयावर मोर्चाचे रुपांतर सभेत झालेत यावेळी कल्याणराव काळे म्हणाले की शरदचंद्रजी पवार यांच्या मुंबई येथील निवास्थानावर जो भ्याड हल्ला करण्यात आला तो निंदणीय असून त्याचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो. महाराष्ट्र हा फुले शाहु, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचाराचे राज्य आहे. यापुढे कोणत्याही नेत्यांवर असे गैरकृत्य केल्यास खपवून घेतले जाणार नाही असे राजकीय हल्ले विकृत प्रवृत्तीच्या लोकांकडून घडून येतात. त्यामुळे भविष्यात देशाच्या सुरक्षेसाठी अशा प्रवृत्ती ठेचून काढणे महतवाचे आहे. तहसिलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात निवास्थानावर झालेल्या हल्यातील सहभागी लोक हे पुर्वप्रशिक्षित असल्याप्रमाणे एकाच प्रकारच्या घोषणा देत दगड व चपला घेवून धावत होते असे चित्र माध्यमाद्वारे पहावयास मिळाले होते. त्यावरुन हा हल्ला पुर्वनियोजित होता का? याचा योग्य यंत्रणेद्वारे तपास करण्यात यावा. गेली 50 वर्षे एस.टी.महामंडळाच्या अधिवेशनात व इतर वेळी मा.शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी एस.टी.कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लावलेले आहेत. त्यामुळे एस.टी.महामंडळातील कर्मचारी त्यांच्या विरोधात शिरवाळ भाषा वापरणार नाहीत अशी खात्री आहे. त्यामुळे सहभागी लोक एस.टी.कर्मचारीच होते का? याचीही यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी. अलीकडे विशिष्ट लोकांनमार्फत राष्ट्रीय नेत्यांवर थेट आरोप करुन खोटी प्रतिष्ठा मिळविण्याचा समाजातील काही जणांकडून वारंवार प्रयत्न केला जातो. मा.पवारसाहेब राष्ट्रीय नेते असल्याने त्यांच्या घरावर हल्ला करुन अशी प्रतिष्ठा मिळविण्याचा प्रयत्न होता का याचीही चौकशी करण्यात यावी. सोशल मिडीयाद्वारे विशिष्ट जात संघटना याचा वापर करुन राष्ट्रीय नेतृत्वावर टिका करण्याचे प्रयत्न वारंवार घडतात अशा सोशल मिडीयावरही टिकाकारांवर चौकशी करुन कारवाई करण्यात यावी. वरील मागण्यांचा सहानुभुतीपुर्वक विचार करुन वरिष्ठ शासकीय पातळीवर उचित कारवाई करण्यात यावी आशा मागण्या करण्यात आल्या.
यावेळी शिवसेनेचे नेते साईनाथ भाऊ अभंगराव,विठठल साखर कारखान्याचे चेअरमन, भगिरथ भालके, कोळी महासंघाचे अध्यक्ष अरुण कोळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख,काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश भादुले, संभाजी ब्रिगेडचे किरण घाडगे यांनी आपले मनोगत व्यक्त करत निषेध व्यक्त केला.
यावेळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष युवराज पाटील, राष्ट्रवादी उद्योग व व्यापार विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्हाध्यक्ष गणेश पाटील, सोलापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संभाजीराजे शिंदे, शहरअध्यक्ष सुधीर भोसले, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस हणमंत मोरे, पंढरपूर शहर शिवसेना अध्यक्ष रवि मुळे, उपजिल्हाप्रमुख सुधीर अभंगराव, महेश साठे, समता परिषदेचे अनिल अभंगराव,मनसेचे तालुकाध्यक्ष शशीकांत शिरगीरे, तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष सुधीर धुमाळ, जि.प.सदस्य अतुल खरात, कृष्णात माळी, काँग्रेसचे माजी तालुका अध्यक्ष बजरंग बागल, युवती जिल्हाध्यक्षा श्रीया भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस महिला तालुकाध्यक्ष राजश्री ताड, शहराध्यक्षा संगिताताई माने, पंढरपूर नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे,प्रशांत शिंदे, लखन चौगुले, माजी नगरसेवक महमंद उस्ताद, शकुर बागवान, जिल्हा सरचिटणीस दिगंबर सुडके, बाळासाहेब शेख युवक शहर अध्यक्ष स्वप्नील जगताप, डॉक्टर सेलचे अमरजित गोडसे, अनिल सप्ताळ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे, कार्याध्यक्ष संजय बंदपटटे, रणजित पाटील, सचिन आदमिले, कृष्णात माळी, सुहास भाळवणर, विजय काळे,सुरज पावले, महिला आघाडीच्या साधनाताई राऊत, शुभांगी जाधव, रंजना हजारे, चारुशिला कुलकर्णी, सारीका गायकवाड, काजल भोरकडे, वर्षा शिंदे, सहकार शिरोमणीचे व्हा.चेअरमन राजेंद्र शिंदे, विठठल सहकारी साखर कारखाना, सहकार शिरोमणी साखर कारखान्याचे सर्व आजी माजी संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचाल सहकार शिरोमणीचे संचालक सुधाकर कवडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार युवकचे जिल्हाध्यक्ष गणेश पाटील यांनी मानले
मोर्चादरम्यान रिक्षावर स्पिकर लावून हल्याच्या वेळी जमावाला शांत करताना खासदार सुप्रिया सुळे यांनी हल्लेखोरांना शांत राहण्याचे केलेले आवाहन स्पिकर लावण्यात आलेले होते. हे ऐकुन शहरवासिय व मोर्चेकर्ऱ्यांनी सुप्रिया सुळे यांच्या धाडसाचे कौतुक केले
भर उन्हात मोर्चामध्ये सहभागी झालेले नागरीक सुरुवातीपासून शेवटच्या भाषणापर्यंत जागेवरुन हल्ले नाहीत.
काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी मोर्चात सहभागी न होण्याचे आवाहन केले होते ते धुडकावून काँग्रेसचे बहुतांश आजी माजी पदाधिकारी मोर्चामध्ये सहभागी झालेले होते.