पंढरीच्या पांडुरंगाच्या नगरीत विकासाची लाट; परिचारक कुटुंबावर सर्वसामान्यांचा वाढता विश्वास
प्रतिनिधी :
पंढरपूर – पांडुरंगाच्या नगरीत लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक विकासकामांनी गेल्या काही काळात नवी उर्जा निर्माण केली असून, यामुळे परिचारक कुटुंबाबद्दल सर्वसामान्यांमध्ये प्रचंड विश्वास वाढताना दिसत आहे. शहराच्या विविध भागांत सुरू असलेल्या कामांनी पंढरपूरच्या प्रगतीची गती अधिक वेगवान झाली आहे.
लोकाभिमुख सेवेचा पाया रचणारे कर्मयोगी माजी आमदार सुधाकर पंत परिचारक यांच्या कार्यशैलीचा वारसा आजही नागरिकांच्या मनात दृढ आहे. हाच वारसा युवकांचे प्रेरणास्थान प्रशांत मालक परिचारक यांनी आधुनिक दृष्टिकोन, दृढनिश्चय आणि समर्पित सेवाभावाने पुढे घेऊन जात आहेत.
रस्ते सुधारणा, स्वच्छता उपक्रम, शैक्षणिक सुविधा, आरोग्यविषयक उपक्रम, तसेच युवकांसाठी उपयुक्त प्रकल्प अशा विविध क्षेत्रांतील विकासकामांमुळे परिचारक कुटुंबाची लोकाभिमुख प्रतिमा अधिक बळकट झाली आहे. यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये समाधान व विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, “पंढरपूरचा चेहरामोहरा बदलत आहे” अशी भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

