स्वेरी मध्ये ‘राष्ट्रीय उद्योजकता दिन’ साजरा



स्वेरी मध्ये ‘राष्ट्रीय उद्योजकता दिन’ साजरा



पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (ऑटोनॉमस) मध्ये एमबीए व इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल (आयआयसी) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय उद्योजकता दिन’ नुकताच साजरा करण्यात आला. या निमित्ताने स्वेरीतील विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील बाजारपेठ आणि उद्योग- व्यवसायांची व त्यांच्या कार्यपद्धतीची समग्र माहिती मिळाली.  

       स्वेरी अंतर्गत असलेल्या संशोधन विभागाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये दि.१० नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजिलेल्या या ‘राष्ट्रीय उद्योजकता' दिनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्यातील ‘डीजीटेक रोबोटीक्स इंडीया प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अजित गटे हे होते. दिपप्रज्वलानानंतर संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ.ए.पी.केने यांनी प्रास्तविकात ‘राष्ट्रीय उद्योजकता दिना’चे महत्व सांगून जागतिक औद्योगिक क्षेत्रातील वस्तुस्थिती सांगितली. प्रमुख पाहुणे व्यवस्थापकीय संचालक अजित गटे हे मार्गदर्शन करताना म्हणाले की, ‘विद्यार्थ्यांनी करिअर करताना आपल्या नव्या कल्पनांना वाव देवून सध्याच्या जागतिक बाजारपेठ व त्यातील व्यवहार याबाबत सूक्ष्मपणे अभ्यास करणे आवश्यक आहे तसेच प्रत्येक क्षेत्रात यशस्वी नेतृत्व केल्यास मिळणाऱ्या यशाला गती येईल व जागतिक बाजारपेठेत आपल्या वस्तूला मोल येईल.’ असे सांगून त्यांनी कंपन्यातील उत्पादने व केली जाणारी वाहतूक व्यवस्था यावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. संस्थेचे संस्थापक व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम.पवार यांच्या सहकार्याने व उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या या ‘राष्ट्रीय उद्योजकता दिन’ कार्यक्रमात एमबीएच्या विभागप्रमुख डॉ. मिनल भोरे, डॉ. एच.बी.रोंगे यांच्यासह एमबीए विभागातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. के. पी. कोंडुभैरी यांनी केले तर स्वेरीच्या इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल (आयआयसी) चे प्रमुख डॉ. डी.डी. रोंगे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad