एस. के. एन. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागात “स्पार्क्स 2K25” कार्यक्रम उत्साहात संपन्न
पंढरपूर, ४ ऑक्टोबर २०२५ – सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी (पंढरपूर) येथील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातर्फे आयोजित “स्पार्क्स 2K25” हा तांत्रिक व सांघिक कार्यक्रम उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडला असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या उपक्रमांतर्गत क्विझ, पोस्टर प्रेझेंटेशन, गेमिंग आणि मॉडेल मेकिंग यांसारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आपली सर्जनशीलता, तांत्रिक कौशल्ये आणि टीमवर्क प्रदर्शित केले. विजेत्यांना आकर्षक बक्षिसांनी गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभागप्रमुख डॉ. श्रीगणेश कदम, तसेच रिसर्च अँड डेव्हलपमेंटचे डिन डॉ. चेतन पिसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी यावेळी आपल्या भाषणात सांगितले की , “स्पार्क्स 2K25 हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना नवकल्पना, नेतृत्वगुण आणि तांत्रिक दृष्टीकोन विकसित करण्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरला आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास निश्चितच चालना मिळते.”
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामध्ये प्रा. सिद्धेश पवार यांनी कार्यक्रम समन्वयक म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली. सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन (SESA) व IGS स्टुडंट चॅप्टर, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या तयारीसाठी विद्यार्थी समन्वयक संकेत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापत्य विभागातील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम सहभाग व परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. माळी हेअर डॉक्टर ट्रान्सप्लांट सेंटर, रत्नप्रभा उद्योग समूह मेडशिंगी, लक्ष्मीनारायण ब्युटी सेंटर, जोगेश्वरी मिसळ (पंढरपूर), वेदांत प्युअर व्हेज, हॉटेल मुन्ना फॅमिली रेस्टॉरंट, हॉटेल शांतीसागर, बिल्डर्स कॉर्नर, कुमार प्रॉपर्टीज, डी. सी. कन्स्ट्रक्शन व फोन वाले यांनी प्रायोजकत्वाद्वारे मोलाचे सहकार्य केले.
या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

