*पंढरपूर सिंहगड महाविदयालयामध्ये संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागात Enhancing Coding Skills with AI Bots या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा*
कोर्टी, ता. पंढरपूर : एस. के. एन. सिंहगड महाविद्यालयामध्ये संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विभागातर्फे Enhancing Coding Skills with AI Bots या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा दिनांक 28 जुलै 2025 रोजी सकाळी 9:30 ते 12:30 या वेळेत यशस्वीरित्या झाली असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
ही कार्यशाळा विभागप्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रा. मनोज कोळी यांच्या समन्वयाने आयोजित करण्यात आली होती.
कार्यक्रमाची सुरुवात सूत्रसंचालकांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यानंतर डॉ. पिंगळे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट क्षेत्रातील वाढता प्रभाव अधोरेखित करणारे मनोगत मांडले. सदरील कार्यशाळेसाठी दोन मान्यवर औद्योगिक तज्ञांना आमंत्रित करण्यात आले होते.
श्री. रुपेश रणवरे, Knowledge Base Consultant यांनी एआय बॉट्सचा ज्ञान-आधारित सॉफ्टवेअर विकासामधील उपयोग व कोडिंग प्रक्रियेतील गती वाढवण्यासाठी त्यांचा प्रभाव यावर सखोल माहिती दिली.
श्री. शिवम मल्हारे, RPA Developer यांनी Robotic Process Automation (RPA) टूल्स आणि AI चा एकत्रित वापर करून रोजच्या कोडिंग कामांना कसे सुलभ करता येते हे प्रत्यक्ष उदाहरणांसह स्पष्ट केले.
दोन्ही वक्त्यांनी ChatGPT, GitHub Copilot यांसारख्या प्लॅटफॉर्मचा वापर करून थेट प्रात्यक्षिके सादर केली. विद्यार्थ्यांनी देखील उत्स्फूर्तपणे सहभाग घेत प्रश्नोत्तर सत्रात आपले विचार मांडले.
कार्यशाळेचा समारोप संवादात्मक प्रश्न उत्तराने झाला. विद्यार्थ्यांना तज्ञांसोबत थेट संवाद साधण्याची संधी मिळाली. कार्यक्रमाला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद मिळाला.
सदरील कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी विभागातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

