*पंढरपूर सिंहगड महाविदयालयामध्ये सॉप्टस्कीलचे प्रशिक्षण संपन्न*
पंढरपूर प्रतिनिधी : पंढरपूर सिंहगड महाविद्यालयामध्ये अंतिम वर्षात शिकत असणा-या सर्व शाखेतील विदयार्थ्यांसाठी १० दिवसांचे कॅम्पस प्लेसमेंट तयारीकरीता आवश्यक असणा-सा सॉप्टस्कीलचे प्रशिक्षण दि.०१ जुलै २०२५ ते १२ जुलै २०२५ या कालावधीत संपन्न झाल्याची माहिती महाविदयालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली.
अल्पावधीतच पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविदयालयाने कॅम्पस प्लेसमेंट क्षेत्रामध्ये महत्वाचा ठसा उमटवला आहे. या अनुषंगाने २०२६ मध्ये पासआऊट होणा-या विदयार्थी वर्गासाठी श्री.चंद्रशेखर आचार्य यांचे ६० तासांचे अत्यंत महत्वाचे सॉप्टस्कीलचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये विदयार्थ्यांना ग्रुप डिस्कशन, रिझ्यूम बिल्डींग, मॉक इंटरइव्हयू, लिंकडिन प्रोफाईल, इग्लीश ग्रामर, व्हरसेंट टेस्ट इ. आवश्यक असणा-या कौशल्याचे सखोल मार्गदर्शन करण्यात आले. पंढरपूर सिंहगड महाविदयालयाचा भर विदयार्थ्यांमध्ये कौशल्य विकसीत करण्यावर असतो. नुकतेच कॉग्नीझंट या बहूराष्ट्रीय सॉप्टवेअर कंपनीने प्रिप्लेसमेंट टॉक अंतिम वर्षात शिकणा-या विदयार्थ्यांसाठी सिंहगड महाविदयालयामध्ये आयोजित करण्यात आले होते. या कंपनीचे कॅम्पस प्लेसमेंट परिक्षा ऑगस्टच्या पहिल्या आठवडयामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. यासाठी सॉप्टस्कीलच्या प्रशिक्षणाचा विदयार्थ्यांना बहूमूल्य फायदा होणार आहे. सोलापूर जिल्हयामध्ये अभियांत्रिकीच्या विदयार्थ्यांसाठी कॉग्नीझंट ही कंपनी कॅम्पस प्लेसमेंटसाठी फक्त सिंहगड महाविदयालयातील विदयार्थ्यांसाठीच ऑगस्ट महिन्यात उपलब्ध झालेली आहे.
हे प्रशिक्षण यशस्वी होणेसाठी महाविदयालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

