पंढरपूर सिंहगड महाविदयालयातील संगणक विभागातील ४ विदयार्थ्यांची एलटीआय माईंडट्री कंपनीत निवड*

 *पंढरपूर सिंहगड महाविदयालयातील संगणक विभागातील ४ विदयार्थ्यांची एलटीआय माईंडट्री कंपनीत निवड*



कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील संगणक विभागात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेली शेळवे, ता.पंढरपूर येथील कु.एैश्वर्या बापू आसबे, मुरारजी पेठ, सोलापूर येथील गायत्री मदन महाजन, माऊली नगर, पंढरपूर येथील ॠतुजा तुकाराम गायकवाड, वाफेगाव, वाघोली येथील अनिकेत रामचंद्र यादव यांची एलटीआय माईंडट्री कंपनीत निवड झाली असून त्‍यांना वार्षिक ४ लाख पॅकेज मिळाले असून 30 जुलै २०२५ मध्ये कंपनीमध्ये रुजू होणार असल्याची माहिती संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभाागाचे विभाग प्रमुख डॉ.सुभाष पिंगळे यांनी दिली. 

एलटीआय माईंडट्री कंपनी ही मुंबईस्थित भारतीय बहूराष्टीय माहिती तंत्रज्ञान सेवा आणि सल्लागार कंपनी आहे. या कंपनीची स्थापना १९९६ मध्ये करण्यात आली आहे. या कंपनीमध्ये एक लाखाहून अधिक अभियंते कार्यरत आहेत. २०२२ मध्ये एलअँडटी इन्फोटेक आणि बेंगलोरस्थित माईंडट्री यांच्या विलीनीकरणातून या कंपनीची स्थापना झाली आहे.  

ही कंपनी दरवर्षी सोलापूर जिल्हयामध्ये फक्त सिंहगड महाविदयालयात विदयार्थ्यांची निवड करण्यासाठी येत असते. चालू शैक्षणिक वर्षात २५३ पेक्षा जास्त कंपन्यानी कॅम्पस प्लेसमेंट डाईव्हसाठी पंढरपूर सिंहगड महाविदयालयाला भेट दिलेली आहे. कंपनीला आवश्यक असलेले ज्ञान, कौशल्य यांचा समन्वय साधून महाविदयालयाकडून उत्कृष्ठ पध्दतीचे प्रशिक्षण आणि प्लेसमेंटची तयारी प्रथम वर्षापासून करुन घेतली जाते. यामुळे पंढरपूर सिंहगड महाविदयालयातील विदयार्थी मुलाखती देण्यासाठी सक्षम होऊन यशस्वी होत आहेत.

वरील विदयार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. दिपक गानमोटे, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ.अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. संदीप लिंगे आदींसह आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad