*सिंहगड पंढरपूर येथे नवीन शैक्षणिक वर्षाची प्रेरणादायी सुरुवात – स्थापत्य अभियांत्रिकी विभागात ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन*
एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर येथे स्थापत्य अभियांत्रिकी विभागात द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी दिनांक १४ जुलै २०२५ रोजी ओरिएंटेशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नवीन शैक्षणिक प्रवासाची सुरुवात विद्यार्थ्यांनी उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात केली.
या कार्यक्रमात पुढील बाबींवर मार्गदर्शन करण्यात आले. ध्येय आणि उद्दिष्टांची ओळख, अभ्यासक्रमाची माहिती व भविष्यातील संधींचा आढावा, सिव्हिल इंजिनिअरिंगमधील नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती, शैक्षणिक नियोजन, इंटर्नशिप व प्रोजेक्ट बाबतचे मार्गदर्शन, विभागीय प्राध्यापक व माजी विद्यार्थ्यांशी संवाद झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून विभागप्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
सरकारी नोकऱ्यांच्या संधींवर प्रकाश टाकताना, विद्यार्थ्यांनी UPSC, MPSC, SSC, RRB आणि इतर सरकारी भरती प्रक्रियांसाठीही तयारी करावी असे मार्गदर्शन केले. "सरकारी क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी केवळ तांत्रिक ज्ञान पुरेसे नाही, तर सामान्य अध्ययन, संख्यात्मक क्षमता, आणि संवाद कौशल्य यावरही भर द्यावा. या दृष्टीने आम्ही महाविद्यालयात विविध मार्गदर्शन शिबिरे आणि स्पर्धा परीक्षा तयारीसाठी मदत करणारे उपक्रम राबविणार आहोत."
कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. चेतन पिसे (डीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट) यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने आणि स्पष्ट दृष्टिकोनासह त्यांच्या व्यावसायिक वाटचालीला सामोरे जाण्यासाठी प्रेरणा देणारा ठरला.
तसेच डॉ. यशवंत पवार, प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. गणेश लकडे, प्रा. अमोल कांबळे, प्रा. अजित करांडे, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. मिलिंद तोंडसे इत्यादी सह विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

