पंढरपूर सिंहगडच्या ५ विदयार्थ्यांची रिलायन्स कंपनीत निवड मेकॅनिकल विदयार्थ्यांनी पटकावले वार्षिक ७.५ पॅकेजची नोकरी

 पंढरपूर सिंहगडच्या ५ विदयार्थ्यांची रिलायन्स कंपनीत निवड


मेकॅनिकल विदयार्थ्यांनी पटकावले वार्षिक ७.५ पॅकेजची नोकरी



पंढरपूर: प्रतिनिधी


कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेले विश्वेश्वरी उमेश कुलकर्णी, आर्या संजय नाळे, ज्ञानेश्वर बाळू सुतार, संकेत सुनिल भोसले, विशाल महादेव नागणे या विदयार्थ्यांची रिलायन्स कंपनीत निवड झाली असल्याची माहिती महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.


एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असतानाच पंतनगर पंढरपूर येथील विश्वेश्वरी उमेश कुलकर्णी, अरण, ता.माढा येथील आर्या संजय नाळे, मेंढापूर, ता.पंढरपूर येथील ज्ञानेश्वर बाळू सुतार, संतपेठ, पंढरपूर येथील संकेत सुनिल भोसले, तांबोळे, ता.मोहोळ येथील विशाल महादेव नागणे यांची रिलायन्स इंडस्ट़ीज लिमिटेड (वार्षिक पॅकेज ७.५ लाख) कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असून हे विदयार्थी रिलायन्स इंडस्ट़ीज लिमिटेड या  कंपनीत ऑगस्ट २०२५ मध्ये रुजू होणार आहेत. 


रिलायन्स इंडस्ट़ीज लिमिटेड ही फॉरचून ५०० कंपनी असून या कंपनीची २०१० मध्ये स्थापना झाली आहे.  या कंपनीचे वेगवेगळया देशामध्ये कार्यालये असून मुंबई हे मुख्य कार्यालय आहे.  ही कंपनी उर्जा, पेटोकेमीकल, ऑईल आणि गॅस, टेक्साईल, टेलिकम्युनिकेशन इ. क्षेत्रात सेवा प्रदान करीत असून ७५००० हून अधिक अभियंता या कंपनीमध्ये कार्यरत आहेत. 


एस.के.एन.सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनियरींग महाविदयालय उत्कृष्ठ प्लेसमेंट व उत्तम निकालासाठी सोलापूर जिल्हयात अग्रेसर आहे. चालू शैक्षणिक वर्षात अंतिम वर्षात शिकणा-या विदयार्थ्यांसाठी २५३ नामांकित बहूराष्टीय कंपन्यामध्ये नौकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे.  वर्षाच्या ३६५ दिवसांमध्ये जवळपास एकदिवसाआड कॅम्पस ड़ाईव्ह आयोजित केल्यामुळे नौकरीच्या प्रचंड संधी उपलब्ध झाल्याने पालक व विदयार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 


अशा या कंपनीत मेकॅनिकल विभागातील विदयार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी, महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. दिपक गानमोटे, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे,  डॉ.अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अतुल कुलकर्णी आदींसह आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad