*जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाचे ललित गांधी यांच्या हस्ते उद्घाटन.*


*जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाचे ललित गांधी यांच्या हस्ते उद्घाटन.*



माढा तालुका प्रतिनीधी -हनुमंत मस्तुद


जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर त्यांनी भगवान महावीर व मौलाना आझाद यांच्या प्रतिमेचे पूजन केले. 

  यावेळी श्री गांधी म्हणाले की, जैन महामंडळ व मौलाना आझाद महामंडळ मार्फत अल्पसंख्याक समाजाला याचा फायदा होणार आहे. कार्यालयाचा परिसर लहान असल्यामुळे लवकरच कार्यालयाचे स्थलांंतर करून देण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. बिराजदार यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर महामंडळाच्या मार्फत शिक्षण कर्जाचा लाभ मिळालेल्या वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज येथे शिकत असलेल्या प्रज्ञा सुरज कुमार आळंद विद्यार्थ्यांनीच स्वागत केले. या विद्यार्थिनींला अडीच लाख रुपयाचं शैक्षणिक कर्ज या कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहे.

    यावेळी आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य सिमभाई बुरान, ज्येष्ठ उद्योगपती केतन भाई शहा, विशाल मेहता, उपसरपंच मोडनिंब कल्पेश भाई शहा, रवींद्र गांधी, मनीष शहा, परवान बागवान, वाहिद मुजावर, सी.ए. बिराजदार आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad