सांगोला फॅबटेक "माॅडर्न सर्वे टेक्निक" या विषयावर ६ दिवसीय कार्यशाळा संपन्न*

 *सांगोला फॅबटेक "माॅडर्न सर्वे टेक्निक" या विषयावर ६ दिवसीय कार्यशाळा संपन्न*



सांगोला: प्रतिनिधी


फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च सांगोला मधील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागांतर्गत "माॅडर्न सर्वे टेक्निक" या विषयावर १९ मे ते २४ मे २०२५ या कालावधीत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची महिती सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. शिवानंद माळी यांनी दिली.

    या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी बोलताना सचिनकुमार कुलथे म्हणाले, विद्यार्थ्यांनी नवनवीन आधुनिक टेक्नॉलॉजीचे ज्ञान आत्मसात केले असेल याचा फायदा विद्यार्थ्यांना भविष्यात निश्चित मिळणार आहे तसेच कार्यशाळेच्या आयोजनाची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी संस्थेचे आभार व्यक्त केले.

    या कार्यशाळेत सहभागी झालेल्या तृप्ती सवणे हिने कार्यशाळेतून खुप महत्वाचे ज्ञान प्राप्त झाले असून अशा कार्यशाळा महाविद्यालयाने आयोजित कराव्यात अशी भावना व्यक्त केली. या कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांनाच प्रमाणपत्र तसेच स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना विशेष प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

   या कार्यशाळेत सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय व तृतीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे सुञसंचालन कुमारी स्नेहल साळुंखे व कुमारी अनुष्का घोडके यांनी केले तर उपस्थितांचे आभार कार्यशाळा समन्वय प्रा. सचिश शेंडगे यांनी मानले.

हि कार्यशाळा फॅबटेक एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती नीलवर्णा बिरासाहेब रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ. अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ. संजय आदाटे व्यवस्थापक प्रतिनिधी प्रा. प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डॉ. रविंद्र शेंडगे, उप प्राचार्या डॉ. विद्याराणी क्षीरसागर, सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. शिवानंद माळी यांच्या मार्गदर्शनाखाली हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.