स्वेरीत ‘ॲडव्हान्सड इंडस्ट्रियल ऑटोमेशन अँड कंट्रोल’यावर कार्यशाळा संपन्न



स्वेरीत ‘ॲडव्हान्सड इंडस्ट्रियल ऑटोमेशन अँड कंट्रोल’यावर कार्यशाळा संपन्न



पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागामध्ये नुकतीच ‘ॲडव्हान्सड इंडस्ट्रियल ऑटोमेशन अँड कंट्रोल’ या विषयावरील कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत एकूण ७९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेत प्रशिक्षणार्थ्यांना 'इंडवेल ऑटोमेशन, मंगरूळ' चे ट्रेनर हिमांशु कुमार यांचे मार्गदर्शन लाभले. 

          स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम पवार यांच्या सहकार्याने, उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवार व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. डी. ए. तंबोळी यांच्या नेतृत्वाखाली आयोजिलेल्या या कार्यशाळेचे उदघाटन प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. एस. एम. खोमने यांच्या हस्ते करण्यात आले. पाहुण्यांचे स्वागत प्रा.आर.एन. खांडेभरड यांनी केले. शैक्षणिक इन्चार्ज डॉ. एम. पी. ठाकरे यांनी यावेळी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागाची अद्ययावत माहिती दिली. विद्यार्थ्यांसाठी अशा कार्यशाळा का राबवल्या जातात, याचे महत्त्व काय? याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा. खोमणे यांनी ‘करिअर करताना अशा पद्धतीच्या कोर्सचा भविष्यात कसा उपयोग होतो यावर विचार प्रकट केले. कार्यशाळेचे ट्रेनर हिमांशू कुमार यांनी सदरचे सहा दिवसीय प्रशिक्षण हे कशा पद्धतीचे असेल याविषयी माहिती दिली. प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी ऑटोमेशन, कंट्रोलर व पीएलसी विषयी माहिती दिली तसेच लँडर डायग्राम, बेसिक प्रोग्रॅमिंग ट्रीक टाईम बेस्ड उदाहरणे, कोडसेस सॉफ्टवेअर मधील प्रोग्रॅमचा सराव करून घेतला. प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी पल्स इन्स्ट्रक्शन पल्स व काउंटरवरील उदाहरणे, प्रोग्रॅमिंग इन जीएक्स डेव्हलपर्स, ऑनलाइन एडिट प्रोजेक्टर डेव्हलपमेंट याविषयी अधिक माहिती दिली. तिसऱ्या दिवशी ‘इंट्रोडक्शन टू डिजिटल इनपुट/आउटपुट वायरिंग कन्सेप्ट, पीएलसी हार्डवेअर व सॉफ्टवेअर, कम्युनिकेशन, प्रोग्रॅम अपलोड व डाउनलोड याविषयी सांगितले. चौथ्या दिवशी इंट्रोडक्शन टू ह्युमन मशिन इंटरफेस स्क्रीन डेव्हलपमेंट, टॅग क्रिएशन, प्रोजेक्ट डेव्हलपमेंट याविषयी माहिती सांगितली. पाचव्या दिवशी ‘एसीड्राईव्ह, स्पीड डायरेक्शन, अनॉलॉग सिस्टीमचे इंट्रोडक्शन, याविषयी सांगितले. सहाव्या दिवशी ‘एक्सलरेशन अँड डी-एक्सेलरेशन टाईम कंट्रोल ऑफ इंडक्शन मोटर, वूईथ पी एल सी, ब्लॉक डायग्राम ऑफ एडीसी अँड डीएसी एप्लीकेशन, रियल टाइम एप्लीकेशन, एस सी ए डी ए मॉनिटरिंग अँड कंट्रोल’ याविषयी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. अखेर या कार्यशाळेमध्ये उपस्थित झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना पाहुण्यांचे हस्ते प्रमाणपत्र देऊन कोर्सची सांगता करण्यात आली. यावेळी प्रा. डी.डी. डफळे, प्रा. व्ही.ए.सावंत यांच्यासह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad