कारखाना सहकारी ठेवायचांय , तर युवराज पाटील यांच्या पाठीशी उभे रहा.
:-अमरजीत पाटील
पंढरपूर (प्रतिनिधी)
आमची निवडणूक भूलथापांवर नाही , पैशावरही नाही. आम्ही ही निवडणूक सभासदांवर सोपवली आहे. यापुढील काळात विठ्ठल कारखाना सहकारी ठेवायचा असेल तर, सभासदांनी युवराज पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे , असे मत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमरजीत पाटील यांनी व्यक्त केले. ते भाळवणी येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी युवराज पाटील, गणेश पाटील, ॲड. दीपक पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
विठ्ठलच्या निवडणुकीचे रणांगण पुरते तापले आहे. युवराज पाटील यांच्या श्री विठ्ठल आण्णाभाऊ विकास पॅनलने प्रचाराचा धुरळा उडवला आहे. शुक्रवारी रात्री भाळवणी येथे या पॅनलची प्रचारासभा पार पडली. या प्रचार सभेत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमरजीत पाटील यांनी विरोधी दोन्ही पॅनलचा पंचनामा केला.
विठ्ठलचे चेअरमन भगीरथ भालके कारखान्यावर बोलायलाच तयार नाहीत. स्व. भारत भालके यांच्यावर बोलून , सभासदांची दिशाभूल करत आहेत. सभासदांची देणी द्यायची राहून गेली असताना, त्यांनीच १९ लाख रुपयांची उचल विठ्ठल क्रेडिट सोसायटीकडून मागील १८ जून रोजी घेतली आहे. सभासदांची दिशाभूल करण्याची वक्तव्ये त्यांच्याकडून होत आहेत.
कारखाना कसा सुरू करणार, यावर न बोलता वेगळ्याच मुद्द्यावर सभासदांना भरकटवत आहेत.
दुसरीकडे खाजगी कारखाना चालवायला घेतलेले अभिजीत पाटील, मीच कारखाना चालू करू शकतो, असे ठासून सांगत आहेत. त्यांच्याकडे असणारे चार कारखाने आणि एक विठ्ठल कारखाना बरोबरीचे आहेत. खाजगी कारखाना चालवणे आणि सहकारी कारखाना चालवणे यात खूपच अंतर आहे. सभासदांच्या परस्पर विठ्ठल कारखाना चालवायला घ्यायला ते निघाले होते. भगीरथ भालके आणि त्यांच्यात सोलापूरमधील हॉटेलमध्ये सौदाही झाला होता. ते या दोघांनीही कबूल केले आहे. युवराज पाटील यांनी कारखान्याच्या जप्तीस स्थगिती मिळवली, आणि पुढे जाऊन या कारखान्याची निवडणूक लागली ; म्हणूनच आज आपण ही निवडणूक लढवू शकत आहे. यापुढील काळात विठ्ठल कारखाना सहकारी ठेवायचा असेल तर, सभासदांनी बिनखुशाल युवराज पाटील यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन अमरजीत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
चौकट
भगीरथ भालके आणि अभिजित पाटील यांनी विठ्ठल कारखान्याबाबतीतले त्यांचे धोरण यापूर्वीच दाखवून दिले आहे. दोघेही कारखान्याचा सौदा करावयास निघाले होते. युवराज पाटील यांच्यामुळेच त्यास बाधा आली. यापुढील काळातही विठ्ठल कारखाना सहकारी ठेवायचा असेल तर, सभासदांनी युवराज पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे ; असे मत अमरजीत पाटील यांनी भाळवणी येथील प्रचार सभेत व्यक्त केले आहे.