कारखाने बंद पाडणाऱ्या टोळीवर विठ्ठलचा सभासद विश्वास ठेवणार नाही-* अभिजीत पाटील *(खरसोळी,आंबे गावात "श्री विठ्ठल परिवर्तन विकास" आघाडीच्या सभेला मोठी गर्दी)*

 *कारखाने बंद पाडणाऱ्या टोळीवर विठ्ठलचा सभासद विश्वास ठेवणार नाही-* अभिजीत पाटील




*(खरसोळी,आंबे गावात "श्री विठ्ठल परिवर्तन विकास" आघाडीच्या सभेला मोठी गर्दी)*



*श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीत अनेक नेत्यांनी व सभासदांनी केला अभिजीत पाटील यांच्या गटात प्रवेश तर काहीचा पाठिंबा*


*यावेळी प्रवेश करत खरसोळी चे नेते हनुमंत नाना पवार,तसेच शेगावचे मा.सरपंच मारुतीभाऊ आटकळे,राजाभाऊ आटकळे, तसेच गुरसाळे येथील महादेव मारुती पवार,मराठा मोर्चा समन्वयक रामभाऊ गायकवाड विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी सोबत*


पंढरपूर प्रतिनिधी/-



सर्वसामान्य सभासद मला भेटत आहेत तसच आम्हीही थेट सभासदांना भेटत आहोत मात्र विरोधी गटाला गावोगावी सभासद नाकारत आहेत, अडवून बील मागत आहेत. त्यामुळे श्री विठ्ठल विकास परिवर्तन आघाडीचा विजय निश्चित आहे असा ठाम विश्वास श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीचे नेते अभिजित पाटील यांनी काल *खरसोळी व आंबे* गावातील प्रचार सभेत बोलताना व्यक्त केला.



पुढे बोलताना ते म्हणाले की "कारखाना कसा चालतो? कसा चालला पाहिजे? कारखान्यातून पैसे कसे मिळतात हे सभासदांना कळणं आवश्यक आहे. परंतु विरोधी गटाचे दोन्ही दादा सभासदांना याची माहिती सांगून काय उपयोग अशी टीका माझ्यावर करत आहेत. मात्र कारखान्याचे जे खरे मालक आहेत त्यांना याची माहिती असायला हवी. कारखान्याचा कारभार पारदर्शक व्हायचा असेल तर सभासदांना कारखाना कसा चालतो याची माहिती देणे आवश्यक आहे. सभासदांना कशाला शहाणं करताय असं मला काही जण म्हणून टोमणे मारत आहेत. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून कारखान्यात नेमकं काय चालतं याची माहिती सभासदांना दिली जात नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही निवडणूक वारसाची आहे की विठ्ठल कारखान्याची हेच कळत नाही असा उपरोधित सवालही त्यांनी उपस्थित केला." सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे सहाशे कोटी रुपयांचा कारखान्यावर कर्जाचा डोंगर झाला आहे. त्यामुळे कारखाना अंधाराच्या खाईत लोटला गेला असून यात प्रकाश निर्माण करण्याचे काम श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडी करेल." असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


कारखाना कसा चालतो याची माहिती मी सभासदांना प्रत्येक सभेमधून देत आहे. मात्र याची काहीजण खिल्ली उडवत आहेत. पण यांना साधी कॉपी ही नीट करता येईना. मग हे कारखाना कसा चालवणार? आज सभासदांचा तरुण मुलगा हुशार झाला आहे.यामुळे विठ्ठल कारखाना कोण चालवू शकतो याची जाणीव त्याला आहे.म्हणून तो श्री विठ्ठल परिवर्तन विकास आघाडीलाच निवडून देईल अशी मला खात्री आहे अशी खात्री त्यांनी व्यक्त केली. तसेच "तुमच्यासमोर जर चार कारखान्याचा चेअरमन अभ्यासपूर्ण मांडणी करत असेल तर त्याला उत्तर देण्यासाठी तुम्हाला किमान अडीच वर्ष तरी एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन अभ्यास करावा लागेल अशी टीका अभिजीत पाटील यांनी विरोधी गटांवर केली


यावेळी प्रा.बी.पी.रोंगे सर, संचालक सावकार गायकवाड, राष्ट्रवादीचे नेते हणमंतनाना पवार, बाजीराव पवार, संजय पवार, अशोक पाटील, शंकर पवार, संचालक सावकार गायकवाड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सचिन पाटील, मारूती आटकळे, राजाभाऊ आटकळे, बबन गोडसे, प्रा.मस्केसर, रयत क्रांतीचे अध्यक्ष दीपक भोसले, व सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad