स्वेरीमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
पंढरपूरः- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूटमध्ये संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम.एम.पवार यांच्या सहकार्याने, उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी पवार यांच्या नेतृत्वाखाली महामानव व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या ‘महापरिनिर्वाण दिना' निमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
प्रारंभी भारतरत्न डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनानंतर प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. यशपाल खेडकर म्हणाले की, ‘भारतरत्न डॉ. आंबेडकर यांनी समाजासाठी व समाजाच्या विकासासाठी अत्यंत मोलाचे कार्य केले. भारतीय समाजाला आकार आणि योग्य दिशा देण्याचे भरीव काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर समतेसाठीच्या लढ्यांमध्येही बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. भारत स्वतंत्र झाल्यापासून आज महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे ते केवळ भारताच्या प्रभावी आणि दमदार राज्यघटनेमुळे शक्य झाले आहे. त्यामुळे डॉ. आंबेडकरांचे कार्य अतिशय महान आहे. समाजात भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी काम केले होते.’ असे सांगून त्यांनी डॉ.आंबेडकर यांचे समाजासाठीचे योगदान अभ्यासपूर्ण शैलीत सांगितले. यावेळी ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे, संशोधन अधिष्ठाता डॉ. ए.पी. केने, डॉ. संदीप वांगीकर, मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. एस.बी. भोसले, कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. एस.पी.पवार, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.डी.ए.तंबोळी, सांस्कृतिक कार्यक्रम विभागप्रमुख डॉ. आर. एन. हरिदास, इंटरनल क्वालिटी अशुरन्स सेलचे समन्वयक डॉ.एस.एस.वांगीकर, पब्लिसिटी- प्रोटोकॉलचे अधिष्ठाता डॉ. डी. एस. चौधरी, एमसीएचे विभागप्रमुख प्रा. मनसब शेख, प्रा. जी.के.कोष्टी, प्रा. पी.बी. आसबे, प्रा. जे.एस. हल्लूर, मिलिंद कोकणे, एस.डी. मोरे, अमोल चंदनशिवे यांच्यासह इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.