सिंहगड कॉलेजचा परिसर विद्यार्थ्यांनी केला कचरा मुक्त
सोलापूर : महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात स्वच्छता ही सेवा अभियान अंतर्गत आज एन. बी. नवले सिंहगड कालेज ऑफ इंजिनिअरिंगचा महाविद्यालय परिसर स्वच्छ केला. घरचा परिसर ज्याप्रमाणे स्वच्छ करतो त्या भावनेने परिसर स्वच्छ केला.
प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वर्गीय पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी केली. ग्रंथालय हाॅलमध्ये प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळेस प्राचार्य डाॅ. एस.डी. नवले, ग्रंथपाल जी एच घोगळे, व्ही. एस. बाबर, पी. पी. शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे प्राध्यापक माणिक शिंदे यांची उपस्थिती होती.
संपूर्ण देशभरात २ ऑक्टोबरपर्यंत 'स्वच्छता ही सेवा' पंधरवडा स्वच्छ भारत मिशनच्या आदेशानुसार साजरा करण्यात येत असून या अंतर्गत 'स्वभाव स्वच्छता - संस्कार स्वच्छता' अभियान राबविले जात आहे ह्या उपक्रमांतर्गत हा उपक्रम घेण्यात आला.
महाविद्यालय परिसरासह अडगळीतील सर्व कचरा संकलन केला. सुरक्षेच्या दृष्टीने सर्वांनी हॅडग्लोज, टोप्या घातल्या होत्या. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही कचरा उचलण्यास मदत केली.
यावेळेस राष्ट्रीय सेवा योजने राष्ट्रीय सेवा योजनाच्या विद्यार्थी स्वयंसेवकांनी हिरिरीने सहभाग नोंदवला. काशिनाथ अंबिगर, संकेत गुरव, आकाश मोरे, सुजित कोरडे, रोहित गावडे, विक्रम शिंदे, प्राजक्ता सोनटक्के, श्रुती नवले. सानिका कोकाटे आदी 30 विद्यार्थ्यांचा समावेश होता.
● सर्वात जास्त प्लास्टिकच्या बाटल्या
कच-यातील 'प्लास्टिक' हा घटक काही केल्या नष्ट न होणारा घटक आहे. याची पुढे अडचण होऊन पाणी तुंबण्याचा मोठा धोका असतो. सांडपाणी वाहून नेणा-या चरीमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक बाटल्या आढळून आल्या. जवळपास आठ पोती कच-यामध्ये पाच पोती प्लास्टिक बाटल्यांचे संकलन झाले. कालेज परिसरात ठिकठिकाणी डस्टबीन असूनही अशा बाटल्या बाहेर फेकला जातो. विद्यार्थ्यांसह महाविद्यालयास भेट देणा-या व्यक्तीने प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक रॅपर इतरत्र न टाकता डस्टबीनमध्ये टाकण्याची आवश्यक असल्याचे मत यावेळेस विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.