*पंढरपूर सिंहगड मध्ये महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्ञी जयंती साजरी*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये बुधवार दिनांक २ ऑक्टोबर २०२४ रोजी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्ञी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्ञी यांच्या प्रतिमेचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांचे हस्ते पुजन व दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.
२ ऑक्टोबर आजच्या दिवशी भारतात अशा दोन व्यक्तींनी जन्म घेतला की त्यांच्यामुळे देशाला जगामध्ये एक वेगळी ओळख मिळाली. एक राष्ट्रपिता महात्मा गांधी ज्यांना आदराने बापू संबोधले जाते आणि दुसरे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री. महात्मा गांधींजींचा जन्मदिवस संपूर्ण देशात ‘गांधी जयंती’ म्हणून साजरा केला जातो, तर संपूर्ण जगामध्ये तो ‘आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन’ म्हणून साजरा केला. देशाच्या स्वातंत्र्यामधील बापूंच्या अहिंसक भूमिकेचे योगदान विसरता न येण्यासारखे आहे. तर दुसऱ्या बाजूला देश आज ‘जय जवान,जय किसान’ अशी घोषणा देणारे देशाचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचाही जन्मदिवस मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरा करण्यात आला. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असणाऱ्या शास्त्रींनी संपूर्ण जगाला दाखवून दिले की, एखाद्याकडे आत्मविश्वास असेल तर कोणतेही ध्येय गाठणे कठीण नसते. सत्य, अहिंसा, अस्पृश्यता याबद्दल समाजजागृती करून खरी मानवता कशी असते याबाबत स्वतःच्याच जीवनाचा आदर्श आपणापुढे ठेवणाऱ्या महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रासंगिकता आजही टिकून असून त्यांच्या सत्य आणि अहिंसेच्या विचारांनी जगभरातील अनेक नेते भारावून
सत्य, अहिंसा, अस्पृश्यता याबद्दल समाजजागृती करून खरी मानवता कशी असते याबाबत स्वतःच्याच जीवनाचा आदर्श आपणापुढे ठेवणाऱ्या महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रासंगिकता आजही टिकून आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. अनिल निकम, विनायक माळी, दादासो बनसोडे, गणेश रणदिवे, सागर गवळी, सेक्युरीटी इंगोले आदींसह महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.