*टाईम मॅनेजमेंट केल्यास ताणतणाव मुक्त शिक्षण घ्याल- डाॅ. संगिता पाटील*
*पंढरपूर सिंहगड मध्ये प्रथम वर्ष मधील विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ*
पंढरपूर: प्रतिनिधी
तुलनात्मक जीवन जगत असताना ताणतणाव येत असतो. जेव्हा आपण इतरांशी तुलना करतो तेव्हा आपणास ञास होत असतो. यासाठी तुलना न करता तणावमुक्त जीवन जगणे आवश्यक आहे. जर आयुष्यात तणावमुक्त जीवन जगला तरच तुम्ही आयुष्यात यशस्वी व्हाल. महाविद्यालयाचे जीवन जगत असताना एन्जॉय करा कारण हेच वय एन्जॉय करायचे असते अन् करिअर कराचे पण असते. या वयातील आत्मविश्वास महत्वाचा असतो. इन्टरनेट ने आपल्याला खुप शिकविले आहे. तो आपला गुरू आहे. प्रत्येक विषयाचा अभ्यास नियमित करा म्हणजे अभ्यासाचा ताण राहणार नाही. एखादा विषय अवघड जात असेल तर सतत त्या विषयाचा अभ्यास केल्यास त्या विषयाची भीती कमी होईल म्हणून पहिल्या दिवसापासून प्रयत्न करत रहा टाईम मॅनेजमेंट केल्यास आपण आयुष्यात निश्चित यशस्वी व्हाल असे मत डाॅ. संगिता पाटील यांनी बोलताना मत व्यक्त केले.
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये गुरुवार दिनांक १२ सप्टेंबर २०२४ रोजी प्रथम वर्ष अभियांत्रिकी मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या मध्ये प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक डाॅ. संगीता पाटील यांचे प्रा. अनिल निकम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रथम वर्ष अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा. अनिल निकम, प्रा. अभिजित सवासे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डाॅ. दिपक गानमोटे यांनी केले.