पांडुरंग परिवार युवक आघाडी आणि प्रणव परिचारक युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार तपस्वी "कर्मयोगी स्व. सुधाकरपंत परिचारक मालक यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ निमित्ताने "मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर" प्राथमिक आरोग्य केंद्र, भाळवणी येथे प्रथम शिबिराचे उद्घाटन
पंढरपूर/ प्रतिनिधी
पांडुरंग परिवार युवक आघाडी आणि प्रणव परिचारक युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने सहकार तपस्वी "कर्मयोगी स्व. सुधाकरपंत परिचारक मालक यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणार्थ...."मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर" (लेन्स बसवून) आज प्राथमिक आरोग्य केंद्र, भाळवणी येथे प्रथम शिबिराचे उद्घाटन सर्व ज्येष्ठ मंडळी, युवा सहकारी, आरोग्य केंद्रातील स्टाफ यांच्या हस्ते पार पडले.
या शिबिरांमध्ये 165 नागरिकांनी तपासणी करून घेतली. यामध्ये 50 रूग्ण हे मोतीबिंदू शस्त्रक्रियासाठी पात्र ठरले आहेत. लवकरच या पात्र रुग्णाची मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. याप्रसंगी आदरणीय मोठ्या मालकांप्रति लोकांचे असलेले प्रेम आणि आठवण बघून मन भारावले. या शिबिरातून सर्वार्थाने स्व.सुधाकर आजोबांच्य संस्कारानूसार समाजासह लोकांना दृष्टी देण्याचे काम होत आहे, असे शिबिराचे आयोजक युवा नेते प्रणव परिचारक यांनी सांगितले.
यावेळी भाळवणी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, पांडुरंग परिवारातील जेष्ठ मार्गदर्शक मंडळी, तरुण सहकारी मित्र, प्रा.आरोग्य केंद्र भाळवणीचे डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ, मित्र उपस्थित होते.