पंढरपूर सिंहगडच्या १७ विद्यार्थ्यांची "बेलराइज इन्डस्ट्रीस लिमिटेड" कंपनीत निवड* ○ ३ लाख वार्षिक पॅकेज: कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड

 *पंढरपूर सिंहगडच्या १७ विद्यार्थ्यांची "बेलराइज इन्डस्ट्रीस लिमिटेड" कंपनीत निवड*


○ ३ लाख वार्षिक पॅकेज: कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड



पंढरपूर: प्रतिनिधी


एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील १७ विद्यार्थ्यांची बेलराइज इन्डस्ट्रीस लिमिटेड कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

 कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील काॅम्प्युटर सायन्स अ‍ॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील पुर्वेश खोबरे, अमित ढोले, प्रतिक्षा दणके, कपिल पिसे, मंदार उंब्रजकर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील ऋत्विक भानवसे, पल्लवी लोखंडे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्म्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील प्रतिक्षा भुजबळ, निखिल बागल, आर्यन नागटिळक मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील शुभम पवार, श्रेयस करंजकर, निकिता मेटकरी, श्रुतिका पोरे, नियंता शेंडगे, आशुतोष कोरे, गणेश सकनुर आदी १७ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असून कंपनीकडून वार्षिक ३ लाख पॅकेज मिळणार आहे.

  पुणे येथील बेलराइज इन्डस्ट्रीस लिमिटेड कंपनीत निवड झालेले विद्यार्थी सॅप कन्सल्टंट म्हणून कार्यरत होणार आहेत. या कंपनीत विद्यार्थ्यांना एक महिन्याचे मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. १९८८ मध्ये स्थापन झालेली हि कंपनी ऑटोमोटिव्ह, व्हाईट गुड्स इंडस्ट्रीजसाठी घटक उत्पादनात अग्रेसर आहे. याशिवाय कंपनीत ऑटोमोटिव्ह शीट मेटल, कास्टिंग पार्ट्स, सस्पेशन आणि मिरर सिस्टीम (दुचाकी, तिन चाकी आणि चार चाकी) वाहनासांठी उत्पादन करते. अशा कंपनीत पंढरपूर सिंहगड मधील १७ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली आहे.

बेलराइज इन्डस्ट्रीस लिमिटेड कंपनी निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. वैभव गोडसे, प्रा. अतुल कुलकर्णी, प्रा. संदिप लिंगे, प्रा. दत्तात्रय कोरके आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad