*पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोर्टी, पंढरपूर महाविद्यालयात दिनांक १९ ऑगस्ट ते २३ ऑगस्ट २०२४ या कालावधीत ए आय/एम एल फॉर जिओ डेटा अनालिसिस या विषयावर कार्यशा॓आ आयोजित करण्यात आली होती. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
ही कार्यशाळा आय आय आर एस इसरो मार्फत आयोजित करण्यात आली होती. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर हे आय आय आर एस इसरो चे नोडल सेंटर असुन या नोडल सेंटरद्वारे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये स्थापत्य अभियांत्रिकी आणि कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थी आणि शिक्षक यांनी सहभागी झाले होते. ही कार्यशाळा ए आय/एम एल फॉर जिओ डेटा अनालिसिस या विषयावर आयोजित करण्यात आली होती.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. चेतन पिसे (डीन रिसर्च अँड डेव्हलपमेंट), नोडल सेंटर प्रमुख प्रा. मिलिंद तोंडसे सह महाविद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षेकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.