स्वेरीने सामाजिक बांधिलकी जपत साजरा केले अनोखे रक्षाबंधन!

              


स्वेरीने सामाजिक बांधिलकी जपत साजरा केले अनोखे रक्षाबंधन!




पंढरपूर- रक्षाबंधन !! तसा भाऊ बहिणीच्या अनोख्या नात्याचा दिवस !! हा सण सर्वत्र विविधतेने व उत्साहात साजरा केला जात असल्याचे पाहतो. या पवित्र सणाच्या निमित्ताने अनेक भाऊ हे बहिणीसाठी महागड्या वस्तू, साडी, भेटवस्तू इ. ओवाळणी म्हणून देत असतात परंतु एक समाजोपयोगी उपक्रम साजरा करून स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी याहून जरा वेगळे कार्य केले आहे, याचीच पंढरपूर पंचक्रोशीत चर्चा होतेय...!

        याचं असं झालं की सोमवारी रक्षाबंधनाच्या निमित्ताने स्वेरी अभियांत्रिकीचे साधारण १०० विद्यार्थी एकत्र जमले, आपसात चर्चा केली आणि कोर्टी रोडलगत असलेल्या 'प्रभा-हिरा प्रतिष्ठान' संचलित विशेष बालकांचे संगोपन केंद्र असलेल्या ‘पालवी’ कडे मार्गस्थ झाले. पालवीच्या आवारात चिमुकली मुले खेळत-बागडत होती. अचानक आलेल्या स्वेरीच्या विद्यार्थ्यांना पाहून मुले कावरी-बावरी झाली. काही समजण्याच्या आत स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी ‘पालवी’च्या प्रमुख श्रीमती मंगलताई शहा यांच्याशी चर्चा करून ‘पालवी’तील सभागृहातच कार्यक्रम घेण्याचे ठरवले. सुरुवातीला प्रवीण येडगे या विद्यार्थ्याने पुढे येऊन प्रास्ताविकात रक्षाबंधन पालवीमध्ये का साजरा करायचा? यामागचा हेतू स्पष्ट केला. या निमित्ताने स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील 'मेसा' (मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडन्टस असोसिएशन) चे विद्यार्थी अध्यक्ष देवेश खरे यांनी पालवीमध्ये येण्याचे प्रयोजन सांगितले. यानंतर चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर उत्साह वाढत होता ‘पालवी’ च्या सचिवा डिंपल घाडगे यांनी आपल्या मनोगतात स्वेरीच्या आजच्या प्रयोजनाबाबत चिमुकल्यांना कल्पना दिल्यानंतर पालवीचा वचननामा सादर केला. ज्यामध्ये पालवी मधील विद्यार्थ्यांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या ऐकून स्वेरीचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या अंगावर शहारे उमटले. यानंतर पालवीच्या चिमुकल्यांनी स्वेरीच्या विद्यार्थ्यांना राख्या बांधल्या. यावेळी त्यांना खाऊ वाटप करण्यात आले. याप्रसंगी स्वेरीच्या विद्यार्थ्यांनी  पालवीत चिमुकल्या हातांनी बनवलेल्या वस्तू, आकर्षक राख्या घेतल्या. त्याचबरोबर चिमुकल्यांना भेट म्हणून मोठी गॅस शेगडी, कॉम्प्युटर साहित्य, पेपर, मुलांना पौष्टिक असे शेंगदाण्याचे लाडू आणि केळी यांसह  जवळपास पाच हजार रुपयांच्या वस्तूंची मदत पालवीतील विद्यार्थ्यांना केली. वायफळ खर्च न करता स्वेरीतील विद्यार्थ्यांनी पैशाचा सदुपयोग व्हावा या हेतूने पालवीतील चिमुकल्यांकडे मदत सोपवली. संपूर्ण दिवस विद्यार्थ्यांनी पालवीतील चिमुकल्यांबरोबर घालविला. यावेळी तेथील बालकांनी आपले कलागुणही सादर केले. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली, कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार यांच्या सहकार्याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.श्रीकृष्ण भोसले व ‘मेसा’चे समन्वयक प्रा.संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून प्रणव पाटील, दिग्विजय बुरा, प्रियंका सोनवणे, गायत्री गायकवाड, रविराज नाईकनवरे यांच्यासह जवळपास शंभर विद्यार्थी- विद्यार्थिनी या उपक्रमाला उपस्थित होते. सदरचा उपक्रम स्वेरीच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या ‘मेसा’ मार्फत घेण्यात आला. यावेळी क्षितिजा उराडे यांनी सूत्रसंचालन केले तर विद्यार्थी प्रतिनिधी देवेश खरे यांनी आभार मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.