पंढरपूर सिंहगडची हरीप्रिया बहिरट यांची एनप्रो कंपनीत निवड* □ ४.५ लाख वार्षिक पॅकेज: कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड

 *पंढरपूर सिंहगडची हरीप्रिया बहिरट यांची एनप्रो कंपनीत निवड*


□ ४.५ लाख वार्षिक पॅकेज: कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड 




पंढरपूर: प्रतिनिधी 


कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात पदव्युत्तर शिक्षण घेत असलेली पंढरपूर येथील कुमारी हरीप्रिया गुरूनाथ बहिरट यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन पुणे येथील एनप्रो प्राइवेट लिमिटेड कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदव्युत्तर विभागाचे विभाग प्रमुख डॉ. बाळासाहेब गंधारे यांनी दिली.

    १९८८ साली एनप्रो कंपनीची स्थापना झाली असून मेकॅनिकल फ्लुइड सिस्टीम्स आणि प्रकिया उपकरणे डिझाईन व निर्मिती मध्ये ही कंपनी अग्रेसर आहे. गेल्या ३३ वर्षामध्ये या बहुराष्ट्रीय नामांकित कंपनीने चार हजार हुन अधिक प्रणालीचा पुरवठा वेगवेगळ्या देशांमध्ये केला आहे.

अशा कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेज मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदव्युत्तर विभागात शिक्षण घेत असतानाच कुमारी हरीप्रिया बहिरट यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असुन कंपनीकडून वार्षिक ४.५ लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे.

   "एनप्रो" प्राइवेट लिमिटेड कंपनी हरीप्रिया बहिरट यांची निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. अतुल आराध्ये, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अतुल कुलकर्णी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.