पंढरपूर सिंहगड मध्ये फ्रेंच व जर्मन भाषा प्रशिक्षणावर व्याख्यान

 *पंढरपूर सिंहगड मध्ये फ्रेंच व जर्मन भाषा प्रशिक्षणावर व्याख्यान*



पंढरपूर: पंढरपूर


कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग मध्ये गुरुवार दिनांक २२ ऑगस्ट २०२४ रोजी फ्रेंच व जर्मन भाषा प्रशिक्षणावर मार्गदर्शनपर व्याख्यान संपन्न झाल्याचे माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली. 

पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेज, रोटरी क्लब पंढरपूर, इनरव्हील क्लब पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होता. या कार्यक्रमासाठी फॉरेन लँग्वेज ऑनलाईन एप्लिकेशन चे संस्थापक शैलेश लेले, इनरव्हील क्लब पंढरपूरच्या अध्यक्षा रश्मी कौलवार, सचिव डॉ. अमृता दोषी, व नगिना बोहरी, प्रा. निशा करांडे उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शैलेश लेले यांनी फ्रेंच व जर्मन भाषा शिकण्याचे फायदे, उपलब्ध असणाऱ्या संधी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन एप्लिकेशन मार्फत दिले जाणारे प्रशिक्षण, तसेच त्यांचा पु. अ. हो. सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या मार्फत चालवला जाणारा परकीय भाषा डिप्लोमा या बाबत माहिती दिली. 

  कार्यक्रमाच्या सुरवातीस मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

  या कार्यक्रमात शैलेश लेले यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. दिपक गानमोटे यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यास शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

ADVERTISEMENT BANNER

📣
येथे आपली जाहिरात द्या
लाखो मराठी वाचकांपर्यंत आपला व्यवसाय
व ब्रँड पोहोचवा!
जाहिरातीसाठी त्वरित संपर्क करा:
tejmaharashtravarta007@gmail.com

TEJ MAHARASHTRA VARTA - REPORTER JOINING

📰

रिपोर्टर जॉइनिंग

तेज महाराष्ट्र वार्ता टीममध्ये सहभागी व्हा

आमच्या टीममध्ये सामील व्हा!
आपल्या परिसरातील बातम्या, समस्या आणि घडामोडींना योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता आपल्या शहर, तालुका आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींचे स्वागत करते.