*पंढरपूर सिंहगड मध्ये उद्योजकता विकास कार्यशाळा
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये गुरुवार दिनांक २२ ऑगस्ट २०२४ रोजी जागतिक उद्योजकता विकास दिनानिमित्त उद्योजकता विकास कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यशाळेचे व्याख्याते नंदकुमार दुपडे व ओंकार गायकवाड यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. या कार्यक्रमात नंदकुमार दुपडे यांनी नवीन उद्योजक कसे असावेत आणि त्यासाठी कोणती तयारी गरजेची आहे या बद्दल महत्वपूर्ण माहिती दिली.
ओंकार गायकवाड यांनी उच्च शिक्षण आणि उद्योजकता विकास या बदल उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेत महाविद्यालयातील सर्व विभागातील विद्यार्थी सहभागी झाले होते .
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी डाॅ. बाळासाहेब गंधारे, प्रा. प्रदीप व्यवहारे , प्रा. झाडे आणि प्रा. जोशी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.