*पंढरपूर सिंहगड मध्ये ऑनलाईन वेबिनार उत्साहात संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये शनिवार दिनांक १३ जुलै २०२४ बेंथम सायन्स पब्लिशर्स शैक्षणिक संचालक डाॅ. गॅरेथ डायक यांचे "रिसर्च पेपर्सचे लेखन आणि प्रकाशन, टिप्स आणि ट्रिक्स" या विषयावर आंतरराष्ट्रीय वेबिनार ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आले होते ते वेबिनार मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर व आय क्यू ए सी अंतर्गत इन्स्टिट्युट्युशन इनोव्हेशन कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने डाॅ. गॅरेथ डायक यांचे "रिसर्च पेपर्सचे लेखन आणि प्रकाशन, टिप्स आणि ट्रिक्स" या विषयावर ऑनलाईन आंतरराष्ट्रीय वेबिनारच्या सुरुवातीस प्रमुख व्याख्याते डाॅ. गॅरेथ डायक यांचा परिचय डाॅ. संपत देशमुख यांनी करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी केले तर उपस्थितांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी ऑनलाईन माध्यमातून प्रमुख पाहुणे डाॅ. गॅरेथ डायक यांचे स्वागत करून मनोगत व्यक्त केले.
यावेळी मार्गदर्शन करताना डाॅ. गॅरेथ डायक म्हणाले, संशोधन करत असताना अनेक गोष्टींचा अभ्यास असणे आवश्यक आहे. चांगले संशाधन, उद्दिष्टे, कामाचे स्वरूप व ज्या समस्येसाठी काम करत आहोत या सर्वगोष्टींचा विचार करावा, संशोधनाचे उद्दिष्ट समाजाच्या हिताचे असणे आवश्यक असते.
या माध्यमातून आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेचे आयोजन करणे, संशोधन पेपरचे प्रकाशन बेंथम सायन्स च्या माध्यमातून करणे तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रकाशन करणे यासाठी चालना मिळणार आहे.
या वेबिनारमुळे पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेज मधील शिक्षक व विद्यार्थ्यांच्या संशोधन वृत्तीला खुप मोठ्या प्रमाणात मार्गदर्शन मिळाले आहे. हा वेबिनार यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील अमोल नवले, संगीता कुलकर्णी सह सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या वेबिनाराचे सुञसंचलन व आभार प्रदर्शन प्रा. नामदेव सावंत यांनी केले.