पंढरपूर सिंहगडच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्म्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्म्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागामध्ये प्रथम वर्षातून द्वितीय वर्षांत पदार्पण केलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्म्युनिकेशन इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी स्वागत समारंभ प्रसंगी बोलताना म्हणाले, दुसऱ्या वर्षाच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्म्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यांना सर्वप्रथम कॉलेज व विभागाचे व्हिजन मिशन बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्म्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात कार्यरत असलेल्या संघटना बद्दल बोलताना त्यांनी विविध उपक्रमाबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली. विविध उपक्रमांचा उपयोग करून घेण्याचे आव्हान या दरम्यान विभाग प्रमुख डॉ. अल्ताफ मुलाणी यांनी या दरम्यान विद्यार्थ्यांना केले. त्याच पद्धतीने विभागात होत असलेल्या इंडस्ट्रियल व्हिजिट व ट्रेनिंग प्रोग्राम याबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्म्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील प्रा. राहुल घोडके यांचे सहकार्य लाभले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्म्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.