*पंढरपूर सिंहगडचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे आणि प्रा.आशिष जोशी यांना भारत सरकारकडून पेटंट बहाल*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे व त्यांचे पीएचडी चे विद्यार्थी प्रा. आशिष जोशी यांनी "लॅग स्क्रू ऑफ डीएचएस असेंबली फॉर ऑस्टिओपोरोटिक बोन टू अव्हॉइड सिमेंट ऑग्यूमेंटेशन" या विषयावर भारत सरकारकडून पेटंट बहाल करण्यात आला आहे.
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये कार्यरत असलेले प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.आशिष जोशी यांनी सदर डिझाईन पेटंटची निर्मिती केली आहे. यामध्ये या पेटंट चा उपयोग मुख्यतः वृद्ध रुग्ण ज्यांचे हाड ऑस्टियोपोरोसिसने ग्रस्त आहेत त्यांच्यासाठी होतो, हे डिझाईन फीमर बोन (मांडीचे हाड) ऑपरेशनसाठी उपयुक्त आहेत. महत्त्वाचे म्हणजे डीएचएस स्क्रू असेंबलीचे ह्या नवीन डिझाइन मुळे ऑपरेशन वेळी वापरण्यात येणाऱ्या सिमेंटच्या वापर कमी होईल ज्यामुळे शरीरातील विष निर्मिती टळेल.
या पेटंट बद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा. एम. एन. नवले यांच्यासह संस्थेतील सर्व संचालक, पंढरपूर सिंहगड काॅलेज मधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.