*पंढरपूर सिंहगड मधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागात विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील स्थापत्य अभियांत्रिकी विभागामध्ये प्रथम वर्षातून द्वितीय वर्षांत पदार्पण केलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी स्वागत समारंभ प्रसंगी दुसऱ्या वर्षाच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांना सर्वप्रथम या विभागाचे व्हिजन आणि मिशन बद्दल माहिती दिली. स्थापत्य अभियांत्रिकी विभागात कार्यरत असलेल्या विद्यार्थी संघटना (सेसा) बद्दल बोलताना त्यांनी विविध उपक्रमांबद्दल महत्वपूर्ण माहिती दिली. विविध उपक्रमांमध्ये आणि स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपला सर्वांगीण विकास साधण्याचे उद्दिष्ट बाळगून विद्यार्थ्यांनी कार्यमग्न राहण्याचे आवाहन या दरम्यान विभाग प्रमुख डॉ. श्रीगणेश कदम यांनी विद्यार्थ्यांना केले. त्याच पद्धतीने विभागात होत असलेल्या इंडस्ट्रियल व्हिजिट, ट्रेनिंग प्रोग्राम आणि गेट परीक्षा मार्गदर्शन केंद्र याबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये सोमवार दिनांक ८ जुलै रोजी प्रथम वर्ष अभियांत्रिकीतुन द्वितीय वर्षात पदार्पण केलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ व मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.