पंढरपूर सिंहगडच्या संदीप क्षीरसागर ची तीन कंपनीत निवड* ○ वार्षिक ७ लाख पॅकेजची नोकरी: कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड

 *पंढरपूर सिंहगडच्या संदीप क्षीरसागर ची तीन कंपनीत निवड*


○ वार्षिक ७ लाख पॅकेजची नोकरी: कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड 



पंढरपूर: प्रतिनिधी


कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेले कुरूल (ता. मोहोळ) येथील संदीप क्षीरसागर यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ.श्याम कुलकर्णी यांनी दिली.

   मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील चतुर्थ वर्षातील संदीप क्षीरसागर यांनी जोशीजांपाला इंजिनिअरिंग प्रा. लिमिटेड (वार्षिक पॅकेज २.६४ लाख), टी ई कनेक्टिव्हिटी इंडिया प्रा. लिमिटेड (वार्षिक पॅकेज ३ लाख) आणि टीसीएस (वार्षिक पॅकेज ७ लाख) या कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन मुलाखती दिल्या होत्या. या मुलाखतीतून तिन्ही कंपनी संदीप क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे.

   "टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस" या उद्योग समूहातील सर्वाधिक बाजार मुल्यांकन असलेली व्यापारी संस्था आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात ११६,३०८ कर्मचारी, ४७ देशातील कार्यालये आणि ५.७ अब्ज अमेरिकी डॉलर वार्षिक उत्पन्न असलेली टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टी.सी.एस.) कंपनी आहे. भारतातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी व्यापारी संस्था म्हणून "टीसीएस" चा उल्लेख केला जातो. अशा कंपनीत संदीप क्षीरसागर हे १८ जुलै २०२४ रोजी ठाणे (मुंबई) येथे रुजू होणार आहेत.

 त्यांच्या निवडीबद्दल प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. अतुल कुलकर्णी आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad