महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या प्रदेश सहसचिव पदी हरिभाऊ प्रक्षाळे यांची निवड.
पुणे .महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांनी आषाढी यात्रेनिमित्त पंढरपूर येथे आले असता महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली.
यावेळी बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष किरण जोशी व सर्वांनु एक मताने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न पंढरपूर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा पश्चिम विभाग प्रमुख जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन महाराष्ट्र दिल्ली तसेच दैनिक कर्मयोगीचे व साप्ताहिक साई सम्राट चे संपादक हरिभाऊ प्रक्षाळे यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या प्रदेश सहसचिव पदी निवड करण्यात आली आहे. निवडीच्या वेळी बोलताना हरिभाऊ प्रक्षाळी म्हणाले की आल्या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सदस्य संघटन व राज्यातील पत्रकारासाठी उपयुक्त असे कार्यक्रम घेऊन पत्रकारांना न्याय देण्याचे काम करणार आहे. तसेच पत्रकारांसाठी पत्रकार कल्याणीसाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची दिलेली जबाबदारी मी विश्वास पात्र राहून यशस्वीरित्या पार पाडेन असे म्हणाले.
ही बैठक खेळीमुळे मध्ये पार पडली असून सर्व पत्रकार बांधवांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.