सांगोल्यात शहर कॉंग्रेस आणि छावा संघटनेच्या वतीने विविध मागण्यांसाठी तहसीलदार यांना निवेदन
दर्जाहीन रस्त्यांच्या दुरुस्तीची आणि विविध ठिकाणी गतीरोधकांची मागणी
सांगोला/ प्रतिनिधी: सांगोला शहर व परिसरात अपघाताचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. याचे प्रमुख कारण हे शहरात येणारे नवीन दर्जाहीन रस्ते व गतिरोधकांचा अभाव हेच असुन
स्टेट हायवे व नॅशनल हायवे हे दोन्ही प्रकारचे रस्ते सांगोला शहरातून जात आहेत. या रस्त्याला स्थानिक प्रशासन, तालुका प्रशासन व संबंधित प्रशासन लक्ष देण्यास तयार नाहीत, त्यामुळे होणाऱ्या नागरिकांच्या आर्थिक, शारीरिक व जीवितहानीस कोण जबाबदार राहणार आहे, हा सवाल सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातुन विचाराला जात आहे. अपघातामुळे कितीतरी कुटुंब नाहक त्रस्त व पोरके होत आहेत. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज निवेदन सादर करण्यात आले आहे, सांगोला शहरांतर्गत सांगोला - कडलास रोड वरील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज पासून कडलास नाका, कडलास नाका ते वासूद चौक, पंढरपूर रोड वरील जलशुद्धीकरण केंद्रापासून विद्यामंदिर प्रशाला, चिंचोली रोड, एखतपुर रोड, मिरज रोड व वाढेगाव नाक्यापासून पाटील वस्ती पर्यंत या सर्व अपघाताला कारणीभूत असलेल्या रस्त्यांची कायमस्वरूपी डागडुजी करून त्या रस्त्यांवर गतिरोधक बसविण्याची नितांत गरज आहे. कडलास नाक्यावरील पंढरपूर कडून जत रस्त्या कडे जाणाऱ्या वळणावर कायमच मोठ्ठा खड्डा पडलेलाअसतो, त्यामुळे अनेक अपघात घडलेले आहेत. तो खड्डा कायमस्वरूपी उपाययोजने द्वारे म्हणजेच ठराविक अंतरापर्यंत काँक्रिटरस्ता वाढविल्यास पुन्हा हा खड्डा पडणार नाही.
स्वातंत्र्य दिना पुर्वीच सदरील कामे पूर्ण न झाल्यास सांगोला शहर काँग्रेस कमिटी आणि छावा संघटना यांच्या कडून प्रशासनाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल यांची नोंद प्रशासनाने घ्यावी, अशा आशयाचे निवेदन सांगोला शहर काँग्रेस व छावा संघटनेच्या वतीने प्रशासनाला सादर करण्यात आले.
यावेळी शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. तौहीदभाई मुल्ला, जिल्हा उपाध्यक्षा महिला कॉंग्रेस कमिटी सौ. मैनाताई बनसोडे, पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ता अखिल भारतीय छावा संघटना श्री. प्रविण घाडगे पाटील, शहर उपाध्यक्ष कॉँग्रेस कमिटी श्री. पांडुरंग माने, शहर अध्यक्ष युवक आघाडी कॉंग्रेस फिरोज मणेरी, मुजावर संघटना तालुका अध्यक्ष श्री. तोफिकभाई मुजावर, अमीर मुजावर (मेजर), विद्यार्थी आघाडी तालुका कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस निशांत जाधव,
असिफ इनामदार, मोहसीन पठाण, रमजान मुल्ला, पप्पू मुजावर, रियाज मणेरी ई. कॉंग्रेस कमिटी व छावा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.