पंढरपूर सिंहगडच्या पल्लवी लोखंडे यांची ३ नामांकित कंपनीत निवड* □ वार्षिक ४ लाख पॅकेज: कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड पंढरपूर: प्रतिनिधी

 *पंढरपूर सिंहगडच्या पल्लवी लोखंडे यांची ३ नामांकित कंपनीत निवड*


□ वार्षिक ४ लाख पॅकेज: कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड 



पंढरपूर: प्रतिनिधी


कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील रोपळे (ता.पंढरपूर) येथील कुमारी पल्लवी हनुमंत लोखंडे हिची कॅम्पस प्लेसमेंट मधुन ३ कंपनीत निवड झाली असल्याची माहिती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग प्रमुख प्रा. विनोदकुमार मोरे यांनी दिली.

     सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेज मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभाग चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असताना कुमारी पल्लवी हनुमंत लोखंडे हिने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टी.सी.एस) (वार्षिक पॅकेज ३.३६ लाख), कॅपजेमिनी (वार्षिक पॅकेज ४ लाख) आणि बेलराइज इन्डस्ट्रीस लिमिटेड (वार्षिक पॅकेज ३ लाख) आदी कंपनीत मुलाखती दिल्या होत्या. या तिन्ही कंपनी कुमारी पल्लवी हनुमंत लोखंडे हिची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली आहे. यापैकी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टी.सी.एस) ह्या कंपनीत मध्ये रुजू होणार असल्याचे तिने सांगितले.

    पल्लवी लोखंडे हिची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. दत्तात्रय कोरके आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad