*पंढरपूर सिंहगडच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात "इलेक्ट्रिक मोटर कंट्रोल सिस्टीम यूज्ड इन ईव्ही इंडस्ट्री" या विषयावर व्याख्यान*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात मंगळवार दिनांक ३० जुलै २०२४ रोजी प्रा. दत्तात्रय काळेल यांचे " इलेक्ट्रिक मोटर कंट्रोल सिस्टीम युज्ड इन ईव्ही इंडस्ट्री" या विषयावर ऑनलाइन पद्धतीने व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. हे व्याख्यान मोठ्या उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या दरम्यान इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील प्राध्यापक अमोल गोडसे यांनी प्रस्तावित करून उपस्थित विद्यार्थ्यांना संबोधित केले.
इलेक्ट्रिक व्हेईकलचा वापर सध्या आणि भविष्यामध्ये खूप महत्त्वाचा असल्यामुळे यामध्ये वापर करण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या मोटर्स पैकी इंडक्शन मोटर चे स्पीड कंट्रोल आणि ऑपरेशन, एनर्जी ची बचत आणि एफिशियन्सी वाढविण्यासाठी ड्राईव्ह मेकॅनिझम सिस्टीम चा वापर करून इलेक्ट्रिक व्हेईकल सिस्टीम मध्ये मॉडर्न पद्धतीने कसा बदल करता येतो. यामध्ये इंडक्शन मोटर ड्रायव्ह कंट्रोल सिस्टीम च्या पद्धती आणि त्याचे वर्किंग प्रोसेस कसे चालते व इलेक्ट्रिक व्हेईकल सिस्टीम मध्ये याचा वापर चांगल्या पद्धतीने एफिशियन्सी वाढवण्यासाठी कसा होतो. याबद्दल प्रा. दत्तात्रय काळेल सर यांनी सखोल मार्गदर्शन केले.
दरम्यान इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील विभाग प्रमुख प्रा. विनोदकुमार मोरे, व्याख्यान आयोजक प्रा. अमोल गोडसे तसेच सर्व शिक्षक व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून सहभाग नोंदवला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.