*राज्यातील विद्यार्थ्यांना (15 ऑगस्ट) स्वातंत्र्य दिन झाल्यावर गणवेश मिळणार का? - संभाजी ब्रिगेड*
*शिक्षण मंत्री दिलीप केसरकर 'एक राज्य एक गणवेश' योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळणे अपेक्षित होते. परंतु अद्यापही राज्यातील विद्यार्थ्यांना गणवेश मिळाले नसल्याने विद्यार्थी व पालक नाराज झाले आहेत. तरी या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ गणवेश मिळावेत अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने राज्यभर विद्यार्थीं, पालकांसह तीव्र आंदोलन करण्यात येईल. सोलापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात व उर्वरित महाराष्ट्रात अजूनही मुलांना गणवेश मिळालेले नाहीत. राज्य सरकारने गणवेश बनवण्याचं कंत्राट महाराष्ट्र सोडून गुजरातच्या कंत्राट दाराला दिल्यामुळे त्यांनी अजून गणवेश बनवलेले नाहीत. या बद्दल संपूर्ण माहिती सचिन जगताप यांनी घेतली आहे.*
*यावर्षीचा स्वातंत्र्य दिन अर्थात 15 ऑगस्ट रोजी राज्यातील सर्व शाळकरी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिन जुन्या कपड्यावरच करावा लागेल अशी चित्र स्पष्ट आहे. सरकारला गुजरातचं भलं करायचं असल्यामुळे राज्यातील गणवेश बनवणाऱ्या लोकांवर अविश्वास दाखवून गणवेशापासून वंचित ठेवण्याचा सुद्धा हा प्रकार दिसतो आहे हे निश्चाधार्ह आहे.*
*काल शिक्षण उपसंचालक यांच्या कार्यालयात निवेदन देण्यात यावे आले. यावेळी शिक्षण सह उपसंचालक पूजा सोळुंके यांनी ते स्वीकारले.*
*त्यावेळी संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते तथा संघटक संतोष शिंदे, सोलापूर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, मध्य जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, महानगर अध्यक्ष अविनाश मोहिते, सोशल मिडिया उपाध्यक्ष अशोक फाजगे, जिल्हा सचिव तेजश्री पवार, महिला आघाडी अध्यक्ष अश्विनी सोनवणे, उद्योग आघाडी सचिव संतोष कराळे, जिल्हा कार्याध्यक्ष साजिद सय्यद, पर्वती महिला आघाडी अध्यक्षा अर्चना गव्हाणे, जिल्हा संघटक रेखा कामठे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.*