*पंढरपूर सिंहगडच्या ८ विद्यार्थ्यांची "ओईएन इंडिया" कंपनीत निवड*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील ८ विद्यार्थ्यांची "ओईएन इंडिया" कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर यांनी दिली.
"ओईएन इंडिया" प्राइवेट लिमिटेड हि कंपनी रिले, ईव्ही- ईव्हीएसई, स्विचेस आणि कस्टम बिल्ट असेंब्ली सारख्या इलेक्ट्रो-मेकॅनिकल घटकांसाठी बाजारातील प्रमुख उत्पादक आहेत. हि कंपनी युरोप, आशिया-मध्य पूर्व आणि सुदूर पूर्व, यूएसए आणि ओशनिया या खंडातील वेगळ्या देशात निर्यात करते. अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग काॅलेज मधील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्म्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेले पळसखेल (ता. आटपाडी) येथील मीनाक्षी संजय जावीर, दिघंची (ता. आटपाडी) येथील शबनम अमीर मुलाणी, राजेश्वरी गजानन मेनकुदळे, एखतपुर (ता. सांगोला) येथील प्रतिक्षा मोहन भुजबळ, आटपाडी येथील विनायक राम ऐवळे, माळखंबी (ता. माळशिरस) येथील वैष्णवी सूर्यकांत शेळके, टाकळी (ता.पंढरपूर) अंजली तात्यासाहेब पवार, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेली गोपाळपुर (ता. पंढरपूर) येथील नंदीनी अभिजित भोसले आदी ८ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड करण्यात आली आहे.
पुणे येथील "ओईएन इंडिया" प्राइवेट लिमिटेड कंपनीत निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, प्रा. अभिजित सवासे, प्रा. दत्तात्रय कोरके, प्रा. वैभव गोडसे आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.