*पंढरपूर सिंहगड मध्ये "फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट" या विषयावर व्हॅल्यू एडिशन प्रोग्रॅम संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मधील काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागात "फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट" या विषयावर व्हॅल्यू एडिशन प्रोग्रॅम मोठ्या उत्साहात संपन्न झाला असल्याची माहिती काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभाग प्रमुख डॉ. सुभाष पिंगळे यांनी दिली.
कोर्टी (तालुका पंढरपूर) येथील एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागात १ जुलै २०२४ ते ११ जुलै २०२४ या कालावधीमध्ये फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट या विषयावर व्हॅल्यू एडिशन प्रोग्राम आयोजित करण्यात आला होता. तो कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक सुरज पवार मॅनेजिंग डायरेक्टर को फाउंडर लीडस सॉफ्ट टेक्नॉलॉजी यांनी फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट या विषयावर महत्वपूर्ण मार्गदर्शन केले.
या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना मल्टिनॅशनल कंपनीमध्ये लागणाऱ्या टेक्नॉलॉजी बद्दल प्रशिक्षण देण्यात आले आणि विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेण्यात आली. ही कार्यशाळा काॅम्प्युटर सायन्स अॅण्ड इंजिनिअरिंग विभागातील तृतीय वर्ष आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकमनिकेशन विभागातील तृतीय वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत महाविद्यालयातील ८० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. ही कार्यशाळा विद्यार्थ्यांना भविष्यातील करिअर साठी उपयुक्त असणाऱ्या टेक्नॉलॉजी चे ज्ञान प्राप्त करण्यासाठी आयोजित केली होती.
ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील सर्व शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.