*पंढरपूर सिंहगड मध्ये "फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम" कार्यशाळा उत्साहात संपन्न*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये सोमवार दिनांक १० जुन २०२४ ते १४ जुन २०२४ या कालावधीत फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. हि कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
या कार्यशाळेत डाॅ. वर्षा देसाई, सुरज बाबर, गणेश भिसे, आदींनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेच्या शेवटी सहभागी प्राध्यापकांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळेस कार्यशाळेत सहभाग झालेल्या प्राध्यापकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे बोलताना म्हणाले, मासिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स शिकणे गरजेचे आहे. जे आपण फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम कार्यशाळेत शिकला आहात ते तुम्ही टिचिंग लर्निग प्रोसेस मध्ये मांडावेत असे मत डाॅ. कैलाश करांडे यांनी यादरम्यान बोलताना व्यक्त केले.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक डाॅ. सुभाष पिंगळे यांनी केले. कार्यशाळेचे समन्वयक म्हणून प्रा. अनुराधा बिनवडे यांनी काम पाहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुमित इंगोले यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. उदय फुले यांनी मानले.
हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेतले.