*पंढरपूर रोटरी क्लबच्या अध्यक्षपदी सोमेश गानमोटे तर सचिव लक्ष्मीकांत कोटगिरी पदी निवड*
पंढरपूर: प्रतिनिधी
रोटरी क्लब पंढरपूर सन २०२४-२५ च्या अध्यक्षपदी सोमेश गानमोटे व सचिव पदी लक्ष्मीकांत कोटगिरी यांच्यासह अनेकांची नवीन कार्यकारिणीत निवड करण्यात आली असल्याची माहिती रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डाॅ. कैलाश करांडे यांनी दिली.
रोटरी क्लबच्या खजिनदार मयूर परिचारक, क्लब ट्रेनर, प्रा. डॉ. कैलाश करांडे, चिफ एक्झि. सेक्रेटरी भारत ढोबळे, जॉईंट सेक्रेटरी बापू पाखरे, जॉईंट ट्रेझरर विश्वंभर पाटील, क्लब ऍडमिनिस्ट्रेशन जयंत हरिदास, मेंबरशिप डेव्हलपमेंट सचिन भिंगे, रोटरी फाउंडेशन ॲड. राजेंद्र केसकर, पब्लिक इमेज सी.ए. अमोल भालेराव, विन्स अँड हॅपी स्कूल दादासाहेब सरडे, लिट्रसी डॉ. उषा अवधूतराव, वुमन्स इम्प्रूमेंट डॉ. संगीता पाटील, कम्युनिटी सर्विस मेडि. डॉ. सुरेश तंटक, कम्युनिटी सर्विस नॉन मेडि. विनोद भाटिया व्होकेशनल सर्विस डॉ. क्षितिजा कदम पाटील, न्यू जनरेशन इंट्रॅक्ट क्लब डॉ. सुलोचना कोडोलकर, युथ सर्विस रायला शुभांगी शिंदे, इंटरनॅशनल सर्व्हिसेस डॉ.मिलिंद लोटके, डि.ई.आय.डॉ. योगेश दोशी, सार्जंट एट आर्म्स अदनान बोहरी, बुलेटिन एडिटर सी.ए. रोहन कोठाडीया,रोटरी क्लब कॉर्डिनेटर कुलभूषण गोडसे, रोटरी कम्युनिटी क्रॉप्स किशोर निकते ,फंड रायझिंग अमरीश गोयल, कोलाब्रेशन ऍक्टिव्हिटीज अंकुश कौलवार, एनवोर्मेन्ट संजय कपडेकर, असिस्टंट गव्हर्नर विश्वास आराध्ये त्याचबरोबर ॲडव्हायझर टीम म्हणून डॉ. दीपक अचलारे, श्रीरंग बागल ,डाॅ.विनय भोपटकर, श्रीकांत देशपांडे, डॉ. अरुण मेन कुदळे डॉ. संभाजी पाचकवडे, मकरंद रत्नपारखी सर ,दीपक शहा व किशोर सोमाणी यांची निवड करण्यात आली.
याशिवाय अध्यक्ष म्हणून सण २०२५-२६ साठी डाॅ. वैभव सादिगले व सण २०२६-२७ साठी मिलिंद वंजारी यांची निवड करण्यात आली. रोटरी क्लब ही आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था असून जगभरात या संस्थेचे क्लबच्या स्वरूपात जाळे पसरलेले आहे त्यापैकीच पंढरपूर रोटरी क्लब हा गेले ८५ वर्ष कार्यरत आहे येणाऱ्या काळात जास्तीत जास्त समाज कार्य करण्याचा कल्बचा मानस आहे. निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे