*पंढरपूर सिंहगडच्या विजय वाघमारे यांची ज्युनिअर इंजिनिअर पदावर नियुक्ती*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता. पंढरपूर येथील एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग विभागातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण पुर्ण केलेले कोर्टी (ता.पंढरपूर) येथील विजय महादेव वाघमारे यांची जिल्हा परिषद सोलापूर येथील जिल्हा स्वच्छता व पाणी मिशन कक्ष मधील पाणी व स्वच्छता सल्लागार पदी निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
जनशक्ती मंञालय, भारत सरकार यांच्या २२ फेब्रुवारी २०२३ च्या जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंमलबजावणी करिता तसेच पाणी पुरवठा योजनांचे स्ञोत बळकटीकरण, पाणी-स्वच्छता, आरोग्य आदी विषयक बाबी करिता जिल्हांना/सहाय्य करण्यासाठी सर्वच जिल्ह्य़ामध्ये दिनांक ३० सप्टेंबर २०२४ या कालावधीत जल फेलो मनुष्यबळ उपलब्ध करून घेणेबाबत जिल्हा परिषदेला निर्देश देण्यात आले होते.
याच अनुशंगाने एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण पुर्ण केलेल्या विजय महादेव वाघमारे यांची पंचायत समिती माढा येथे पाणी व स्वच्छता व्यवस्थापन सल्लागार म्हणून निवड झाली आहे.
त्याच्या या निवडीबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डॉ. चेतन पिसे, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. श्याम कुलकर्णी, डाॅ. अतुल आराध्ये, डाॅ. बाळासाहेब गंधारे, डॉ. सोमनाथ कोळी, डाॅ. अल्ताफ मुलाणी, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. संपत देशमुख, डॉ. समीर कटेकर, डॉ. यशवंत पवार, डाॅ. दिपक गानमोटे, प्रा. विनोद मोरे, प्रा. अनिल निकम आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.