स्वेरीत ड्रोन टेस्ट बेंच विकसित इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागाची भव्य कामगिरी


स्वेरीत ड्रोन टेस्ट बेंच विकसित ईलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागाची भव्य कामगिरी

 


पंढरपूर- गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री.विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागात ड्रोन टेस्ट बेंच विकसित करण्यात आला आहे. इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग विभागात अंतिम वर्षात शिक्षण घेणारे रोहन नवनाथ सुरवसे, सागर उमेश पाटील, सार्थक संजय लोखंडे आणि अमन अन्वरहुसेन शेख या विद्यार्थ्यांनी ड्रोन क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यातून हा ड्रोन टेस्ट बेंच विकसित करण्यात आलेला आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.  

        स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगे यांच्या दिशादर्शक नेतृत्वाखाली व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, विभागप्रमुख डॉ. दीप्ती तंबोळी, प्रकल्प मार्गदर्शक डॉ. मोहन ठाकरे व प्रा. सागर कवडे यांच्या सहकार्याने रोहन सुरवसे, सागर पाटील, सार्थक लोखंडे आणि अमन शेख या विद्यार्थ्यांनी ड्रोनसाठी प्रगत टेस्ट बेंच यशस्वीपणे विकसित केला आहे. या ड्रोन टेस्ट बेंचच्या माध्यमातून ड्रोनची स्थिरता, वेग, पेलोड क्षमता आणि त्यासाठी आवश्यक बॅटरीची कार्य करण्याची क्षमता व त्याचा एकूण कालावधी आदी बाबी तपासल्या जाणार आहेत. ड्रोन सुरक्षितता आणि आपत्कालीन प्रतिसाद या बाबी देखील सुनिश्चित केल्या जाणार आहेत तसेच मोटर्स, प्रोपेलर्स, सेन्सर्स आणि कम्युनिकेशन सिस्टीमची चाचणी करण्यासाठी माहिती गोळा करून ड्रोन संदर्भातील भविष्य कालीन संशोधनासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील नवीन संकल्पना आणि त्या संदर्भातील यश संपादन करण्यासाठी स्वेरी मध्ये मोठया प्रमाणावर कार्य सुरु आहे. स्वेरीतील ड्रोन प्रकल्पातून नवनवीन संशोधनासाठी विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना प्रेरणा मिळत आहे. यावरून स्वेरीचे विद्यार्थी हे केवळ अभ्यासाताच निपुण नसून ते ड्रोन तंत्रज्ञानात देखील अग्रेसर असल्याचे स्पष्ट होते. ड्रोन प्रकल्पाचे परीक्षक डॉ. बादलकुमार हे या निमित्ताने स्वेरीत उपस्थित होते. ड्रोन संदर्भात विद्यार्थ्यांनी आणि प्राध्यापकांनी केलेल्या कामगिरीमुळे स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे, स्वेरीचे अध्यक्ष दादासाहेब रोंगे, उपाध्यक्ष हनीफ शेख, संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी, स्वेरी कॅम्पस इन्चार्ज डॉ.एम.एम.पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी यांनी सर्व सहभागी व प्रकल्पातील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad