*पंढरपूर सिंहगड मध्ये "फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम"*
पंढरपूर: प्रतिनिधी
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये सोमवार दिनांक १० जुन २०२४ ते १४ जुन २०२४ या कालावधीत होणाऱ्या फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम या कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, प्रमुख मान्यवर सुरज बाबर, गणेश भिसे, डाॅ. वर्षा देसाई, डाॅ. सुभाष पिंगळे, प्रा. अनुराधा बिनवडे-मोरे आदींच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम या कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर सुरज बाबर, गणेश भिसे यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे तसेच डाॅ. वर्षा देसाई यांचे प्रा. अनुराधा बिनवडे-मोरे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व शाल देऊन सन्मान करण्यात आला.
यामध्ये डाॅ. वर्षा देसाई, गणेश लोखंडे, डाॅ. सुहास पाचपांडे, डाॅ. महेश शिंदे, के. के. राॅय आदी मान्यवर फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम या कार्यशाळेत मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. सुभाष पिंगळे यांनी केले तर सुञसंचलन प्रा. सुमित इंगोले यांनी केले. हि कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी परिश्रम घेत आहेत.