*पंढरपूर सिंहगडच्या अमृता कांबळे हिची "कनिष्ठ अभियंता" पदी निवड*
पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात शिक्षण घेतलेल्या कुमारी अमृता विजय कांबळे यांची रायगड येथील ग्रामीण पाणी पुरवठा बांधकाम विभागात "कनिष्ठ अभियंता" म्हणून निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये देण्यात येत असलेल्या उत्कृष्ट शिक्षण पद्धतीमुळे तसेच अचूक मार्गदर्शनामुळे मी आज स्पर्धा परीक्षेत यशाचे शिखर गाठू शकले असल्याचे मत कुमारी अमृता कांबळे हिने पञकारांशी बोलताना सांगितले.
२०२३ मध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात आलेल्या सरळसेवा पदभरती मधुन कुमारी अमृता कांबळे हिची ग्रामीण पाणी पुरवठा बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता पदी निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. सोमनाथ कोळी, डाॅ. दिपक गानमोटे, डाॅ. अतुल आराध्ये, प्रा. डाॅ. बाळासाहेब गंधारे, डाॅ. यशवंत पवार आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.