*मंगळवेढा बस स्थानकाच्या सुधारणेसाठी मंजूर दोन कोटी 28 लाखाच्या कामाचा आज शुभारंभ*
*आ आवताडेंच्या हस्ते होणार भूमिपूजन*
प्रतिनिधी
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या निधीतून मंगळवेढा तालुक्यातील एसटी स्टँडच्या सुधारण्यासाठी दोन कोटी 28 लाख रुपये आमदार समाधान आवताडे यांनी मंजूर करून आणले असून त्यामधून परिसर सुधारणा करणे,काँक्रिटीकरण करणे या कामाचा शुभारंभ रविवारी सकाळी नऊ वाजता होणार असुन या कार्यकर्त्यांनी सकाळी नऊ वाजता मंगळवेढा बसस्थानक येथे उपस्थित राहण्याचे आवाहन सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी आमदार समाधान आवताडे यांनी बसस्थानकात भेट देऊन बस स्थानकाची परिस्थिती जाणून घेतली होती त्यावेळी बस स्थानकातील अवस्था पाहून त्यांनी आगार प्रमुखांना दुरुस्ती व स्वच्छतेसाठीचा प्रस्ताव तयार करून देण्यास सांगितले होते त्यानुसार बस स्थानकाच्या सुधारण्यासाठी प्रस्ताव तयार करून मंगळवेढा आगार प्रमुखांनी आमदार आवताडे यांचे मार्फत शासनास सादर केला होता, त्यानुसार बस स्थानक परिसर काँक्रिटीकरण करणे व परिसराची सुधारणा करणे या कामासाठी दोन कोटी 28 लाख रुपये मंजूर झाले आहेत त्या कामाचा शुभारंभ आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थितीत रविवारी सकाळी नऊ वाजता होणार असल्याचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रदीप खांडेकर यांच्याकडून सांगण्यात आले.

