पुणे जिल्ह्यातील अनधिकृत तसेच विशेषतः हिंजवडी परिसरातील अनधिकृत पब व हॉटेल्स वर कारवाई करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटांची मागणी

 पुणे जिल्ह्यातील अनधिकृत तसेच विशेषतः हिंजवडी परिसरातील अनधिकृत पब व हॉटेल्स वर कारवाई करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटांची मागणी ...



पुणे प्रतिनिधी - 

 हिंजवडी परिसर हा आय टी पार्क असल्यामुळे सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रहदारी वाढल्यामुळे गेल्या काही वर्षापासून अनधिकृत पब तसेच हॉटेल्स 24 तास विना परवाना चालू आहेत.

 सदर पब व हॉटेल्स असलेल्या जागा देखील अनधिकृत आहेत. तसेच सदर ठिकाणी रात्रभर अनधिकृतरित्या पब सुरू असल्यामुळे कोणाची कोणतीही चौकशी न करता पैसे घेऊन अल्पवयीन मुले तसेच तरुणाईला प्रवेश दिला जातो. सदर पब मुळे रात्रभर पब बाहेर मद्यधुंद अवस्थेत तरुणाई फिरत असते त्यामुळे त्याठिकाणी छेडछाड तसेच मारहाणीच्या घटना वारंवार घडत असतात. त्यामुळे पुण्यामध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर पब बाबत वारंवार तक्रार करून देखील कारवाई होत नाही. त्यामुळे सदर अनधिकृत पब व हॉटेल्स पोलिसांच्या मेहेरबानी मुळे अनधिकृतरित्या विना परवाना चालू आहेत. तसेच त्यांच्या विरुद्ध कोणतीही कारवाई होत नाही.

   तरी माझी आपणास विनंती आहे की सदर तक्रारी प्रमाणे तात्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.


यावेळी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष - अक्षय घोडके , ख्रिश्चन सेल शहराध्यक्ष - शौल कांबळे,चिंचवड विधानसभा कार्याध्यक्ष - आशिष पांढरे, शहर समन्वयक - विनय शिंदे हे उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad