*अहिल्यादेवी होळकर यांचे महिला सक्षमीकरणासाठी मोलाचे योगदान- डाॅ. स्वानंद कुलकर्णी*
*पंढरपूर सिंहगड मध्ये अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन*
पंढरपूर: प्रतिनिधी
अहिल्यादेवी होळकर यांनी महिला सक्षमीकरण आणि समाज कल्याणासाठी काम केले आहे. त्यांनी महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण आणि शिक्षणासाठी केंद्रे स्थापन केली. त्यांच्या विविध क्षेत्रातील सहभागाला प्रोत्साहन दिले, विधवांची स्थिती सुधारण्यात त्यांनी मदत केली, धार्मिक सहिष्णुता वाढवण्यात योगदान दिले आणि विविध समुदायांमध्ये एकोपा वाढवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. अहिल्यादेवी एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्ती होत्या. पूर्वीच्या कायद्यांमध्ये त्यांनी परिस्थितीनुसार काही सुधारणा केल्या. अहिल्यादेवी होळकर यांचे समाजातील योगदान आणि त्यांचे पुरोगामी शासन आजही लोकांना प्रेरणा देत असल्याचे मत डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी यादरम्यान बोलताना व्यक्त केले.
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये शुक्रवार दिनांक ३१ मे २०२४ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंतीनिमित्त एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, डाॅ. अल्ताफ मुलाणी, प्रा. नामदेव सावंत, प्रा. अविनाश हराळे, नवनाथ माळी आदींच्या हस्ते दिपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.
यादरम्यान महाविद्यालयातील डाॅ. गणेश बिराजदार, एकनाथ इंगवले, सिद्धेश्वर लवटे, संजय बनकर, पांडूरंग परचंडे, विनायक म्हेञे, बाळासाहेब शेंडे, अमोल कोळी, दत्तात्रय पाटील, गणेश वसेकर आदींसह अनेक कर्मचारीवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.