*लक्ष्मी दहिवडीतील महात्मा फुले युवा मंचाचे पाणपोई च्या माध्यमातून सामाजिक कार्य कौतुकास्पद- आमदार समाधान आवताडे*
● ध्येय क्रांती ग्रंथालयास आमदार आवताडे भरघोस निधी सह जागा देण्याचे आश्वासन
लक्ष्मी दहिवडी: प्रतिनिधी
सामाजिक भान डोळ्यासमोर ठेवून गेल्या अनेक वर्षापासून महात्मा फुले युवा मंच याञेत येणाऱ्या भाविक-भक्तांना पिण्याची पाण्याची सोय उपलब्ध करून सामाजिक बांधिलकी जोपासत आहेत. प्रत्येक वर्षी पेक्षा यावर्षी उन्हाचा वाढता विक्रमी पारा पाहता येणाऱ्या भाविकांसाठी स्वच्छ व थंडगार पाणी उपलब्ध व्हावे यासाठी महात्मा फुले युवा मंच ने सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी सुरु केलेला या उपक्रम अतिशय स्तुत्य कौतुकास्पद असल्याचे मत आमदार आवताडे यांनी व्यक्त केले.
लक्ष्मी दहिवडी (ता. मंगळवेढा) येथील लक्ष्मी देवीची याञा चालू असुन या याञेत सालाबाद प्रमाणे सामाजिक बांधिलकीतून महात्मा फुले युवा मंच च्या माध्यमातून पाणपोई चे उद्घाटन आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन नंतर गावातील युवकांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी ध्येय क्रांती वाचनालय कार्यालयास भेट देऊन भविष्यात आर्थिक निधी सह जागेचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यादरम्यान आमदार समाधान आवताडे यांनी महात्मा फुले युवा मंच कार्यकर्त्यांना दिले.
ग्रामदैवत श्री लक्ष्मीदेवी यात्रेनिमित्त महात्मा फुले मंचाचे सदस्य विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रमोदराजे बनसोडे यांच्या हस्ते आमदार समाधान दादा आवताडे यांचा हार, फेटा, शाल देऊन सत्कार करण्यात आला.
यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आला.
यादरम्यान माजी सभापती प्रदीप खांडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित दादा पवार गटाचे नेते रामेश्वर मासाळ, अँड. शिवानंद पाटील, महात्मा फुले युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष अनिल बनसोडे, विठ्ठल टाकळे, सरपंच अनिल पाटील, बजरंग शिंगाडे, मच्छिंद्र सरगर, नवनाथ बनसोडे, पुष्पककुमार सोनवले, किशोर वाघमारे, सुनिल बनसोडे, मोहन वाघमारे, दगडू माळी, किरण टाकळे, स्वप्निल टाकळे, बाळासाहेब बनसोडे, राजकुमार कडलासकर, तुकाराम टाकळे, संतोष वाघमारे, आर. डी. बनसोडे, मच्छिंद्र बनसोडे, डाॅ. राजकुमार बनसोडे, स्वप्निल बनसोडे, निलेश टाकळे, अवधूत घोडके, सयाजी बनसोडे, विनोद बनसोडे आदींसह महात्मा फुले युवा मंच सर्व कार्यकर्ते सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. विठ्ठल टाकळे यांनी केले.